भारताचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव हा त्याच्या दमदार फलंदाजीसाठी ओळखला जातो. सध्या त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 सीरीज खेळण्यात व्यस्त आहे. दरम्यानच एक गमतीशीर किस्सा झाला असून तो चाहत्यांमध्ये चांगलाच रंगला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा टी-20 सामना कमी धावसंख्येचा होता. भारताने हा सामना जिंकला असला तरी, चांगल्या फलंदाजीसाठी ओळखले जाणारे खेळाडू(player) त्यांच्या बॅटने आवश्यक तेवढी कमाल करण्यत अपयशी ठरले. अभिषेक शर्मा त्यापैकी एक आहे. तो सीरीझच्या सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना धूळ चारत धडाकेबाज कामगिरी करत होता. पण या सामन्यात काही वेगळच घडलं.

अभिषेक शर्माने चौथ्या टी-20 मध्ये 21 चेंडूत 28 धावा केल्या. अभिषेक हा असा खेळाडू आहे जो सामान्यतः 200 किंवा त्याहून अधिक स्ट्राईक रेटने फलंदाजी करतो, पण क्वीन्सलँड टी-20 सामना हा एक दुर्मिळ प्रसंग होता जिथे ऑस्ट्रेलियाने या डावखुऱ्या फलंदाजाला दमदार खेळीपासून रोखले. चौथ्या टी 20 मध्ये त्याचा स्ट्राईक रेट 133.33 होता.या सामन्यात 10 चेंडूत 20 धावा काढणारा भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवनेही अभिषेकला त्याच्या कमी स्ट्राईक रेटबद्दल ट्रोल केले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संघ बसमध्ये चढत असताना सूर्याने विचारले, ” तुम्ही कधी सिंहाला गवत खाताना पाहिले आहे का?” तो पुढे अभिषेककडे बोट दाखवत म्हणाला, “आज हा सिंह हळूहळू गवत खात होता.”

भारताचा 167/8 धावांचा टप्पा ऑस्ट्रेलियासाठी खूपच जास्त ठरला. यजमान संघ 18.2 ओव्हरमध्ये ऑल आउट होण्यापूर्वी फक्त 119 धावा करू शकला. सामन्यानंतर सूर्यकुमारने(player) कबूल केले की, खेळपट्टी ही सामान्य टी20 खेळपट्टी नव्हती जिथे संघ 200 पेक्षा जास्त धावा सहज करू शकतो.हे लक्षात घेण्यासारखे आहे की भारताने पहिल्या चार सामन्यांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता अगदी थरारक फायनल सामना आज (8 नोव्हेंबर 2025)ला ब्रिस्बेनमधील गॅबा येथे खेळला जाईल. ऑस्ट्रेलिया मालिका बरोबरीत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल तर भारत सामना जिकण्याचे प्रयत्न करेल. हा रसाकशीचा सामना पाहणे अतिशय रंजक ठरेल यात काही शंका नाही.

हेही वाचा :

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार!
UPI पेमेंट करा आणि मिळवा 7,500 रुपये कॅशबॅक; बँकेची खास ऑफर 
विकी-कतरिनाचा मुलगा जगात पाऊल टाकताच किती कोटींचा बनला मालक?