जर तुम्ही रोजच्या व्यवहारांसाठी UPI पेमेंटचा वापर करत असाल, तर डीसीबी बँकेची नवीन ऑफर तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते. खासगी क्षेत्रातील डीसीबी बँकेने आपल्या हॅपी सेव्हिंग्स अकाउंट धारकांसाठी मोठी कॅशबॅक(cashback) योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार, ग्राहकांना UPI द्वारे पैसे पाठवताना वर्षभरात 7,500 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो.

बँकेच्या माहितीनुसार, हॅपी सेव्हिंग्स अकाउंटधारकांना दर महिन्याला जास्तीत जास्त ₹625 पर्यंत आणि वर्षभरात ₹7,500 पर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. यासाठी ग्राहकांनी सर्वप्रथम डीसीबी बँकेत Happy Savings Account उघडणे आवश्यक आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही UPI द्वारे पैसे पाठवाल (डेबिट ट्रान्झॅक्शन), तेव्हा बँक प्रत्येक तीन महिन्यांनी म्हणजेच तिमाहीत एकदा कॅशबॅकची रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा करेल.
या खात्याशी संबंधित काही अटीदेखील आहेत. ग्राहकांनी खात्यात दर महिन्याला किमान ₹10,000 एवरेज मंथली बॅलन्स आणि ₹25,000 एवरेज क्वार्टरली बॅलन्स राखणे आवश्यक आहे. तसेच, प्रत्येक UPI ट्रान्झॅक्शनची किमान रक्कम ₹500 असावी. याशिवाय ग्राहकांना RTGS, NEFT आणि IMPS व्यवहार मोफत मिळतात आणि डीसीबी बँकेच्या कोणत्याही एटीएमवरून अनलिमिटेड फ्री ट्रान्झॅक्शनची सुविधा उपलब्ध आहे.
डीसीबी बँकेच्या या ऑफरमुळे नियमित UPI वापरकर्त्यांना मोठा फायदा होणार आहे. UPI प्रणालीद्वारे मोबाईलच्या माध्यमातून कधीही आणि कुठेही तत्काळ पैसे पाठवणे किंवा स्वीकारणे शक्य होते. ही प्रणाली नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी विकसित केली आहे आणि ती Google Pay, PhonePe, Paytm, BHIM यांसारख्या लोकप्रिय अॅप्सशी जोडली जाते.आता रोजच्या व्यवहारांत फक्त पेमेंटच नव्हे, तर कॅशबॅकचाही(cashback) लाभ मिळवण्याची संधी डीसीबी बँक आपल्या ग्राहकांना देत आहे.

हेही वाचा :
विकी-कतरिनाचा मुलगा जगात पाऊल टाकताच किती कोटींचा बनला मालक?
कुणाला नकोसे झाले आहेत मनोज जरांगे पाटील…..?
अजित पवार- पार्थ पवारांचे टेन्शन वाढणार…