कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी:
मराठा समाजाला आरक्षण(reservation) देण्यात यशस्वी (?) ठरलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर आता कोणताच विषय शिल्लक नसल्यामुळे आता ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बोलू लागले आहेत. इतर विषयांवर सुद्धा आपल्या प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. आता त्यांना ठार मारण्याचा कट रचला जातो आहे असा सणसणाटी आरोप त्यांनी केला आहे आणि पोलिसांकडून प्राथमिक पातळीवर त्याची चौकशी सुरू झाली आहे. मुळातच त्यांना ठार मारून कोणाचे व्यक्तिगत किंवा संघटनात्मक भले होणार आहे? किंवा ते हयात असल्यामुळे कुणाचे वाईट होणार आहे? किंवा कोणाची मोठी अडचण होणार आहे?या दोन प्रश्नांच्या उत्तरावर “कटा”चे गांभीर्य ठरणार आहे.नुकत्याच झालेल्या दिवाळी सणात भाऊबीजेच्या निमित्ताने घरी जेवायला बोलावून”फूड पॉयझनिंग”अर्थात त्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नात विष कालवण्यात येणार होते जेणेकरून त्यांचा गेम होईल.

असे मनोज जरांगे पाटील यांनीच सांगितले आहे. कांचन आणि बर्डे या दोन संशयास्पद व्यक्तींची नावे सुद्धा त्यांनी घेतली आहेत. या दोघांनी आपणाला ठार मारायची सुपारी घेतली होती असा खळबळ देण्यात आरोपही त्यांनी केला आहे. आता स्थानिक पोलीस या तथाकथित कटकारस्थानाची चौकशी करतील. आणि जे काही सत्य आहे ते बाहेर येईल.मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याला ठार मारण्याच्या कटकारस्थानामागे धनंजय मुंडे हेच आहेत असे सांगून टाकले आहे. आता धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात व्यक्तिगत दुश्मनी नाही आणि असण्याचे कारणही नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी मुंडे यांनी प्रचंड विरोध केला आहे असे घडलेले नाही. मनोज जरांगे पाटील यांचा काटा काढला तर मुंडे यांचा व्यक्तिगत पातळीवर कोणता फायदा होणार आहे? किंवा मनोज जरांगे पाटील हे जिवंत असल्यामुळे मुंडे यांच्यावर कोणती आपत्ती कोसळणार होती?
एखाद्याला ठार मारण्यासाठी, आणित्याचे नियोजन करण्याचा एक भाग म्हणून कटकरण्यासाठी सबळ हेतू त्यामागे असावा लागतो.मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण(reservation) मिळवून दिले (?)त्यामुळे ओबीसी समाजाचे अपरिमित नुकसान झाले आहे. या नुकसानीला जबाबदार ठरवून त्यांना ठार मारण्याचा निर्णय घेतला गेला आहे असे क्षणभर गृहीत धरले तरी, त्यामुळे आरक्षणासंदर्भात घेतलेला निर्णय रद्द तर होऊ शकत नाही. तर मग मारण्यामागचे प्रयोजन काय? व्यक्ती मरेल चळवळ कशी मरेल?मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे आणि तेही ओबीसींच्या कोट्यातून मिळाले पाहिजेही मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील हे तीन वर्षांपूर्वी आंदोलनात उतरले होते.अंतरवाली सराटी या गावातील त्यांचे आमरण उपोषण राज्यभर आणि देशभर गाजले होते ते पोलीस लाठीमारामुळे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे नवे नेतृत्व मराठा समाजाला मिळाले. त्यानंतर त्यांनी सातत्याने रस्त्यावर उतरून लढा उभा केला.
हा लढा उभा करताना आणि तो चालवताना मनोज जरांगे पाटील हे सातत्याने देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांना टार्गेट करत होते. लढ्यातील अनेक भाषणांमध्ये त्यांनी माझ्या जीवाला धोका आहे, मला मारण्याचा प्रयत्न होतो आहे, होणार आहे, कट केला जातो आहे असे अनेकदा सांगितले आहे. पण आपल्या जीवावर कोण उठलय हे मात्र ते सांगताना दिसत नव्हते.आता मात्र त्यांनी मला ठार मारण्यासाठी धनंजय मुंडे यांनी सुपारी दिली आहे. मला अन्नातून विष देऊन मारायचे किंवा तत्सम मार्गाने ठार मारायचे याबद्दल कट रचला गेला आहे आणि त्यात धनंजय मुंडे सहभागी आहेत असा खळबळ घेण्यात आरोप त्यांनी केला आहे.वास्तविक धनंजय मुंडे यांनी मराठा आरक्षण समाजाला प्रत्यक्ष विरोध कधीही केलेला नाही आणि नव्हता. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे हे ते सांगताना दिसत होते. मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांच्यावर कटकारस्थानाचा आरोप केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे.
बीड जिल्हा परिषदेमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठीचा ठराव मांडणारा आणि तो मंजूर करून घेणारा मी होतोविधिमंडळाच्या अधिवेशनातही मी याबद्दल माझे स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना ठार मारून मला काय मिळणार आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.गेल्या तीन वर्षांपासून मनोज जरांगे पाटील हे रस्त्यावरउतरून संघर्ष करत आहेत आणि तेव्हा त्यांना मारण्याचा किंवा त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे असे कधीही घडलेलेनाही.मला ठार मारण्यासाठी कट्टर कारस्थान रचले जात आहे, मारण्याची सुपारी दिली गेली आहे पण त्या मागची नेमकी कारणे काय आहेत हे मात्र मनोज जरांगे पाटील सांगत नाहीत. मला ठार मारल्या नंतर धनंजय मुंडे यांचा नेमका कोणता फायदा होणार आहे? हे त्यांनी सांगायला हवे. आणि मी आज जिवंत असल्यामुळे धनंजय मुंडे यांचे किती नुकसान होणार आहे? किंवा होत आहे? हे स्पष्टपणे त्यांनी सांगितले असते तर बरे झाले असते.

हेही वाचा :
अजित पवार- पार्थ पवारांचे टेन्शन वाढणार…
भारत-ऑस्ट्रेलिया पाचवा T20 सामना मोफत कसा पाहता येईल
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये या बड्या भाजप नेत्याने गुंतवला मोठा पैसा