बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (restaurant)आणि तिचा पती राज कुंद्रा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपांनंतर कोर्टाने त्यांना विदेश प्रवासास मनाई केली आहे. शिल्पाने एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी परवानगी मागितली होती, मात्र न्यायालयाने स्पष्ट आदेश दिला की, विदेशात जाण्यापूर्वी 60 कोटी रुपये कोर्टात जमा करावे लागतील.

दरम्यान, या प्रकरणामुळे शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा पुन्हा चर्चेत असताना तिच्या ‘बॅस्टियन ॲट द टॉप’ या आलिशान रेस्टॉरंटकडे (restaurant)सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. मुंबईतील कोहिनूर स्क्वेअरच्या 48व्या मजल्यावर असलेले हे रेस्टॉरंट उच्चभ्रू ग्राहकांसाठी खास ठिकाण मानले जाते. याच ‘बॅस्टियन’ ब्रँडचा विस्तार आता गोव्यातही करण्यात आला आहे.स्रोतांनुसार, या रेस्टॉरंटमधून शिल्पा शेट्टी दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कमाई करते. परंतु आता या रेस्टॉरंटच्या मालकीबाबतही मोठा खुलासा झाला आहे. भाजप नेते प्रसाद लाड यांनी स्वतः उघड केले आहे की, बॅस्टियन रेस्टॉरंटमध्ये त्यांची 33.33 टक्के भागीदारी आहे.

एका मुलाखतीत बोलताना प्रसाद लाड म्हणाले,

“रेस्टॉरंटचा आमचा फार मोठा बिझनेस आहे. माझ्या मुलाची या क्षेत्रात आवड आहे. ‘बॅस्टियन’मध्ये शिल्पा शेट्टी, रणजीत बिंद्रा आणि मी असे आम्ही तिघे भागीदार आहोत.”शिल्पा शेट्टीच्या या बॅस्टियन रेस्टॉरंटमध्ये दिल्या जाणाऱ्या पदार्थांच्या किमती तब्बल हजारोंमध्ये आहेत, तरीसुद्धा मुंबईतील नामांकित सेलिब्रिटी आणि व्यावसायिक हे रेस्टॉरंट पसंत करतात.आता फसवणूक प्रकरण, कोर्टाचा आदेश आणि बॅस्टियनमधील राजकीय भागीदारी या सर्वांमुळे शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

हेही वाचा :

दररोज 2 वेलची खाल्ल्यामुळे शरीरात दिसून येतील ‘हे’ बदल….
लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी! 
पाणी मुरलंय “जमिनी”त! अजित पवार अडचणीत!