गुगल मॅपमध्ये(Google Map) मध्ये 10 नव्या फीचर्सचा समावेश, Gemini AI सह आणखी काय आहे खास)जेमिनी AI सह आणखी 10 नवीन फीचर्स जोडण्यात आले आहेत. याशिवाय अनेक नवीन स्मार्ट सुविधा, सेफ्टी अलर्ट आणि नवीन ट्रॅव्हल मोड्सचा देखील या फीचर्समध्ये समावेश करण्यात आला आहे. तुम्ही फोनचा वापर न करता देखील मॅप्सला अनेक प्रश्न विचारू शकता आणि वेगवेगळ्या जागा शोधू शकता. गुगल मॅप्समध्ये जोडलेले हे नवीन फीचर्स कोणते आहेत आणि त्यांचा वापर कसा केला जाऊ शकतो, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

गुगल मॅप्समध्ये आता तुम्ही Gemini च्या मदतीने गाडी चालवाताना देखील प्रश्न विचारू शकणार आहात. जसे की या मार्गावर कोणते बजेट-फ्रेंडली रेस्टोरेंट आहे का किंवा कोणत्या ठिकाणी चांगले जेवण मिळते. EV चार्जिंग स्टेशन शोधण्यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो.मॅप्सचे हे नवीन फीचर तुम्हाला डेस्टिनेशन आणि रूट संबंधित माहिती जेणार आहे, जसे की तुमच्या आजूबाजूचे आकर्षण, स्थानिक दुकान किंवा फूड स्पॉट्स. असं सांगितलं जात आहे की, गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या Inspirations फीचरचे हे अपग्रेड वर्जन आहे.

गूगल आता NHAI सह मिळून रस्ता बंद किंवा रस्त्याचे काम सुरु असल्याचे रीयल-टाइम रोड अपडेट्स देणार आहे. ज्यामुळे युजर्स त्यांच्या प्रवासासाठी चांगला मार्ग निवडू शकणार आहेत.गुगल मॅप्सवरून (Google Map)आता युजर्स थेट मेट्रो तिकीट बुक करू शकणार आहात. हि सर्विस लवकरच दिल्ली, बंगळुरु, कोच्चि, मुंबई आणि चेन्नईमध्ये सुरु होणार आहे. युजर्स गुगल वॉलेटमधून तिकीट सेव्ह करू शकणार आहेत.प्रवासादरम्यान फ्लाईओवरवर जायचे की नाही याबाबत अनेकजण गोंधळतात. हा गोंधल दूर करण्यासाठी आता एक नवीन फीचर जोडलं जात आहे. आता हे काम आवाजाद्वारे केले जाईल जेणेकरून तुम्हाला स्क्रीनकडे पाहण्याचीही गरज भासणार नाही.गूगलने हे फीचर खास इंडियन यूजर्ससाठी सादर केलं आहे. ज्यामुळे आता युजर्स त्यांचे टू-व्हीलर आयकॉन कस्टमाइज करू शकणार आहात.

हेही वाचा :

ऐश्वर्या रायने केला बच्चन कुटुंबाबद्दल सर्वात मोठा खुलासा, म्हणाली…
लाडक्या बहिणींना eKYC साठी मुदतवाढ मिळणार? 
‘या’ ४ जिल्ह्यांमधून जाणार नवा हायवे, असा असणार रूट