बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री (actress)ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मागील काही दिवसांपासून ती तिच्या चित्रपटांपेक्षा खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेचा विषय ठरत आहे. 2007 मध्ये अभिषेक बच्चनसोबत विवाहबंधनात अडकलेली ऐश्वर्या राय आता पुन्हा चर्चेत आली आहे कारण तिने बच्चन कुटुंबाबद्दल दिलेला मोठा खुलासा समोर आला आहे.ऐश्वर्याने एका मुलाखतीत सांगितले की, ती बच्चन घरात प्रथमच गेली तेव्हा तिला त्या घरातील वातावरण अगदी आपल्याच घरासारखे वाटले. ती म्हणाली, “मी ज्या कौटुंबिक मूल्यांसह वाढले तेच मला त्या घरातही जाणवले. ज्यावेळी मी त्या घरात प्रवेश केला, त्याच क्षणी त्यांनी मला सांगितले – आम्ही आमच्या मुलीचे स्वागत करत आहोत.” या एका विधानाने ऐश्वर्याने बच्चन कुटुंबातील आपुलकीचे चित्र उभे केले आहे.

मुलाखतीदरम्यान ऐश्वर्या रायने(actress) अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्याबद्दलही भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, “अमिताभजी माझे वडील आहेत आणि जयाजी माझी आई आहेत.” तिच्या या विधानावरून ती बच्चन कुटुंबाशी किती जवळून जोडलेली आहे, हे स्पष्ट होते. ऐश्वर्याने सांगितले की, लग्नानंतर तिला कधीच परके वाटले नाही आणि बच्चन घरातील सर्व सदस्यांनी तिला आदर आणि सन्मानाने स्वीकारले.तिच्या या वक्तव्यानंतर चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा बच्चन कुटुंबातील संबंधांबद्दल चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यात तणाव असल्याच्या चर्चा सुरू आहेत, मात्र या जुन्या मुलाखतीमुळे वेगळाच संदर्भ समोर आला आहे.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची लव्ह स्टोरी बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत राहिलेली आहे. दोघे एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जवळ आले आणि नंतर अभिषेकने परदेशात ऐश्वर्याला प्रपोज केले. काही दिवसांच्या डेटिंगनंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. या लग्नाने बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली होती.लग्नानंतरही ऐश्वर्या रायने अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आणि बॉलिवूडमध्ये आपली ओळख कायम ठेवली. सध्या ती आपल्या मुलगी आराध्या बच्चनसोबत वारंवार कार्यक्रमांमध्ये दिसते. ऐश्वर्या रायचा हा खुलासा पुन्हा एकदा दाखवतो की, तिचे आणि बच्चन कुटुंबाचे नाते आजही सन्मान आणि प्रेमाने जपले गेले आहे.

हेही वाचा :
लाडक्या बहिणींना eKYC साठी मुदतवाढ मिळणार?
‘या’ ४ जिल्ह्यांमधून जाणार नवा हायवे, असा असणार रूट
सावधान! लाखो Android युजर्सना सरकारचा तातडीचा इशारा…