वजन(weight) नियंत्रणात ठेवायचे असल्यास फक्त काय खाता हे महत्त्वाचे नाही, तर अन्न कसे शिजवले जाते आणि किती प्रमाणात खात आहात, हे देखील खूप महत्वाचे आहे. अन्न शिजवण्याची पद्धत त्याच्या कॅलरीज आणि पोषणमूल्यावर थेट परिणाम करते, त्यामुळे चुकीच्या पद्धतीने बनवलेले पदार्थ वजन वाढवू शकतात.

प्रोटीनयुक्त पदार्थ जसे की चिकन, अंडी किंवा दही वजन(weight)कमी करण्यासाठी उपयुक्त असतात, पण जर ते जास्त तेलात तळले किंवा जास्त मसाले घालून बनवले, तर त्यांचा फायदा कमी होतो. बटाटे उकडलेले खाल्ले तर कमी कॅलरीचे आणि पोट भरणारे असतात, पण तळलेले बटाटे सहजपणे वजन वाढवू शकतात.
ब्लॅक कॉफी जवळजवळ कॅलरीशून्य असून मेटाबॉलिझम वाढवते, परंतु त्यात साखर, क्रीम किंवा सिरप घालल्यास ती उच्च कॅलरी पेय बनते आणि वजन वाढवू शकते. म्हणून, वजन नियंत्रणासाठी फक्त अन्नाचा प्रकार न पाहता, त्याची तयारीची पद्धत आणि प्रमाणावर लक्ष देणे गरजेचे आहे. योग्य पद्धतीने बनवलेले अन्नच शरीरासाठी पोषक आणि उपयुक्त ठरते.

हेही वाचा :
परफ्यूम कारखान्यात लागली आग; सहा जणांचा होरपळून मृत्यू, VIDEO व्हायरल
महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर आरबीआयने लावले कडक निर्बंध
‘तुझं करिअर बिघडवेन..’ जेव्हा बिग बींनी प्रसिद्ध गायकाला दिली धमकी !