तुर्कीच्या वायव्येकडी भागात एका परफ्यूम(perfume) कारखान्याला भीषण आग लागली आहे. शनिवारी (०८ नोव्हेंबर) सकाळी ही घटना घडली. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त समोर आले आहे, तर एकजण गंभीर जखमी आहे. या घटनेने आग लागलेल्या परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच तुर्कीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. सध्या आग विझवण्याचे आणि आगीत अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहे. तसेच आसपासचा परिसर खाल करण्याचे आदेशही देण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तुर्कीच्या कोकाली प्रांतात ही घटना घडली आहे. एका कारखान्याला अचानक आग लागली आणि मोठा स्फोट झाला असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले.

या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला असून त्यांची ओळख पटवण्याचे कार्य सुरु आहे. यामध्ये १ जण गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.सध्या आग लागण्यामागचे कारण अस्पष्ट आहे. स्थानिक वेळेनुसार शनिवारी (०८ नोव्हेंबर) सकाळी ९ वाजात ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शनींच्या म्हणण्यानुसार, आग लागण्यापूर्वी अनेक स्फोटांचे आवाज ऐकू येत होते. सध्या आगीचे कारण अस्पष्ट असून या घटनेचा तपास घेतला जात आहे. आग बरीच आटोक्यात आणण्यात आली आहे.
Dilovası’nda mahalle arasında bir parfüm fabrikası.
— Lütfü Türkkan (@LutfuTurkkan) November 8, 2025
Çıkan yangında 6 vatandaşımızın hayatını kaybettiğini, 1’i ağır 5 vatandaşımızın yaralandığı bilgisi var.
Hayatını kaybeden vatandaşlarımıza Allah’tan rahmet, yaralı vatandaşlarımıza şifa diliyorum. pic.twitter.com/zp0nmnduMb
तसेच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवाय तुर्कीच्या सरकारने आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांवर दु:ख व्यक्त केले आहे. कोकाली प्रांताचे गव्हर्नर अक्तास यांनी घटनेची चौकशी सुरु असल्याचे म्हटले आहे. या घटनेने संपूर्ण कोकाली प्रांतता घबराट पसरली आहे.सध्या या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, परफ्यूम(perfume) कारखान्याची बिल्डींग पूर्णपत: जळाली आहे. हवेत आगीचे लोट आणि काळा धूर पसरला आहे. अग्निशमन दल आग विझवण्याचे कार्य करत आहे. लोकांमध्ये गोंधळ उडाला असून जीव-वाचवण्यासाठी इकडे-तिकडे पळत आहेत. लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

हेही वाचा :
महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर आरबीआयने लावले कडक निर्बंध
‘तुझं करिअर बिघडवेन..’ जेव्हा बिग बींनी प्रसिद्ध गायकाला दिली धमकी !
‘या’ 5 भाज्यांमध्ये खच्चून भरलंय आयर्न व व्हिटॅमिन सी