रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा ढवळून निघाली आहेत. पालकमंत्री पदाच्या वादानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील तणाव आता उघडपणे समोर आला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या राष्ट्रवादी (elections)काँग्रेसच्या रायगड विभागीय आढावा बैठकीत “शिवसेनेसोबत युती नको” असा स्पष्ट सूर उमटल्याने महायुतीतील धुसफूस आणखीनच वाढला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणांचा विचार करून निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य जिल्हा संघटनांना द्यावे, असे सांगितले. यामुळे रायगड जिल्ह्यात आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढेल की युतीत, याबाबत आता चर्चेला जोर आला आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, आदितीताई तटकरे, रुपाली चाकणकर, अनिकेत तटकरे, जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यासह पक्षाचे जिल्हा आणि महानगरपालिका पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबईत नुकतीच पार पडलेल्या या बैठक रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच् पदाधिकाऱ्यांनी आपले कार्यअहवा सादर करताना शिवसेनेसोबतव् युतीविरोधात ठाम मत मांडले. बहुतां पदाधिकाऱ्यांनी “भाजपसोबत युन करण्यास आम्ही तयार आहोत, पण शि गटाच्या शिवसेनेसोबत(elections) युती नको” अ भूमिका स्पष्टपणे मांडली.पालकमंत्री पदावरून आधीच राष्ट्रवादी आणि शिंदे गटात तणाव निर्माण झाला होता. आता कार्यकर्त्यांच्या नाराजीसह आमदारांच्या थेट इशाऱ्यामुळे महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये अंतर्गत कलह वाढण्याची शक्यता आहे. राज्य पातळीवर अजित पवार आणि शिंदे युती टिकवण्याचे प्रयत्न करत असले तरी रायगडसह कोकणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र मार्ग निवडू शकते, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

निवडणुकीचे वारे आता घोंगाऊ लागले असून राजकिय पक्षांकडुन मोर्चे बांधणी वेगाने सुरु आहे. देवरुख नगरपंचायतीवर तसेच पंचायत समितीच्या सभापतीपदी देखील महिलाच राखीव असल्याने संगमेश्वर तालुक्यावर महिलाराज येणार आहे. मात्र गेल्या अडीच वर्षातील राजकिय उलथा पालथी पाहता यावेळी देवरुख नगरपंचायतीवर भाजपला सत्ता टिकविण्यात यश येणार कि महायुती की महाविकास आघाडीची सत्ता काबीज करणार हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे. सत्ता परिवर्तन व्हावे अशी अनेकांची भुमिका दिसुन येत आहे. तालुक्यातील देवरुख या नगरपंचायतीची ही तिसरी पंचवार्षिक निवडणूक होत आहे. ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायत झाल्यानंतर २०१३ ला पहिली निवडणुक झाली.

हेही वाचा :

अजितदादांना मोठा धक्का, बड्या नेत्यानं सोडली साथ
आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो दुधी, भाजी खायला आवडत नसेल तर त्यापासून बनवा हे 5 चविष्ट पदार्थ
RCB विक्रीसाठी सज्ज! विराट कोहलीच्या टीमचा नवीन मालक कोण होणार?