गेल्या कित्येक दिवसांपासून मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतपेढीच्या निवडणुकीची चर्चा होती. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंनी युती केली होती. दोन्ही भावांचं उत्सर्ष पॅनेल या निवडणुकीच्या रिंगणात उतरलं होतं. दरम्यान, या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा दारूण पराभव झाला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ठाकरे बंधूंनी एकत्र यावे असे म्हटले जात होते. या निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गट एकत्र आले पण त्यांचा पराभव झाला. दरम्यान, आता या निवडणुकीत ठाकरे नावाचा ब्रँड का चालला नाही, याची नेमकी कारणं समोर आली आहेत.
वरिष्ठ नेत्यांचे निवडणुकीकडे दुर्लक्ष
बेस्टच्या पतपेढी निवडणुकीकडे आगामी पालिका निवडणुकीसाठी चाचणी परीक्षा म्हणून पाहिले जात होते. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास नेमका काय चमत्कार होऊ शकतो? हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मात्र निकालानंतर ठाकरे बंधूंचं उत्कर्ष पॅनेल पराभूत झाल्याचे समोर आले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे ठाकर गटच्या वरिष्ठ नेत्यांनी या निवडणुकीकडे दुर्लक्ष केले. वरिष्ठ नेत्यांनी या निवडणुकीत प्रचार केला नाही.
महापालिकेत शिवसेना (संयुक्त शिवसेना) अडीच दशके सत्तेत होती. मात्र सत्तेत असूनही कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आले. हीच बाब आता ठाकरे गटाला भोवल्याचे म्हटले जात आहे. कामगार मदत करतील आणि ठाकरे ब्रँण्डचा प्रभाव मतदारांवर पडेल, असे ठाकरे गट आणि मनसेने ग्रहित धरले. त्याचा परिणाम निकालावर झाला. आणखी एक बाब म्हणजे उत्कर्ष पॅनेललने दिलेल्या एकूण उमेदवारांपैकी काही उमेदवारावरून ठाकरेंच्या शिवसेनेतच मतभेद होते. हा विसंवाद पतपेढी निवडणुकीत भोवला.