केंद्र सरकारने सर्व फोनमध्ये संचार साथी अॅप डाउनलोड करायला सांगितले आहे.(downloaded)संचार साथी अॅप हा प्ले स्टोअरवर उपलब्ध झाला आहे. लाखो लोकांनी अवघ्या काही दिवसात हा अॅप डाउनलोड केला आहे. सायबर सिक्युरिटीच्या दृष्टीने हा अॅप डाउनलोड करणे गरजेचे आहे, असं सरकारचं म्हणणं आहे.दूरसंचार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संचार साथी अॅप मंगळवारी जवळपास लाखो लोकांनी डाउननोड केले आहेत. एका दिवसात अॅप डाउनलोड करणाऱ्यांची संख्या ६० हजारांवरील ६ लाख झाली आहे. त्यामुळे हा संचार साथी अॅप ग्राहकांच्या पसंतीस आल्याचे दिसत आहे.विरोधी पक्षनेत्यांनी संचार साथी अॅपवर अनेक आरोप लावले आहे. या अ‍ॅपमुळे नागरिकांच्या प्रायव्हसीचे उल्लंघन होईल, असा आरोप केला जात होता.

मात्र, दूरसंचार विभागाने स्पष्ट केलंय की, दररोज संचार साथी अॅप डाउनलोड करण्याची संख्या १० पट वाढत आहे. एका दिवसात लाखो लोकांनी अ‍ॅप डाउनलोड केलं आहे. (downloaded)लोकांचा अॅपवरील विश्वास वाढत आहे.अधिकृत माहितीनुसार, १.५ कोटी लोकांनी संचार साथी अॅप डाउनलोड केले आहे. या अॅपमुळे मोबाईलमध्ये फसवणूक होत असल्यास अलर्ट मिळणार आहे. या अॅपमुळे फोनमध्ये सायबर सिक्युरीटी असणार आहे. तुमच्या फोनमध्ये जर कोणता फ्रॉड नंबर किंवा मेसेज आला तर त्याचा अलर्ट तुम्हाला मिळणार आहे. तसेच तुमच्या फोनचा IMEI नंबर हा दुसऱ्या कोणाला दिला जाणार नाही. अनेकदा एकाच IMEI नंबरचे अनेक फोन असतात. त्यामुळे गुन्हे होतात. मात्र, आता एकाच व्यक्तीकडे एकच नंबर असणार आहे. त्यामुळे जर फ्रॉड झाला तरी गुन्हेगारांना शोधणे खूप सोपे होणार आहे.

मोबाईल कंपन्यांना दिले निर्देश
दूरसंचार विभागाने दिलेल्या निर्देशानुसार, भारतात उत्पादित आणि (downloaded)आयात केलेल्या सर्व नवीन फोनमध्ये हा अॅप असणे आवश्यक आहे. १२० मोबाईल कंपन्यांना याबाबत आदेश दिले आहे. ९० दिवसांच्या आत हे अॅप फोनमध्ये डाउनलोड करणे गरजेचे आहे.

हेही वाचा :

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्यात नवे धोरण लागू

केंद्र सरकारने 2026 मधील सुट्ट्यांची यादी केली जाहीर! जाणून घ्या कधी

हिवाळ्यात वाढतोय ब्रेन स्ट्रोकचा धोका; जाणून घ्या तज्ज्ञांचा खास