देशातील रस्ते विकासाला मोठ्या प्रमाणात वेग मिळत असताना महामार्गांची संख्या झपाट्याने वाढत आहे.(vehicle)महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर रोड कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करण्यात आली आहे. 2014 नंतर रस्त्यांची जाळी हजारो किलोमीटरने वाढली असून प्रवास अधिक सुलभ झाला आहे. मात्र, महामार्गांसोबत टोल नाके देखील वाढले आहेत. त्यामुळे टोल नाके पार करण्यासाठी वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात टोल टॅक्स भरावा लागत होता.याच पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने टोल संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. विशेषतः टोल नाक्याजवळ राहणाऱ्या वाहनचालकांसाठी हा नवीन नियम मोठा दिलासा देणारा आहे. शासनाने जारी केलेल्या नव्या धोरणानुसार, टोल नाक्यापासून ठराविक अंतरावर राहणाऱ्या नागरिकांना आता टोल टॅक्स भरावा लागणार नाही. त्यामुळे आता टोल खर्चात लक्षणीय बचत होणार आहे.

आज देशात एक हजाराहून अधिक टोल प्लाझा आहेत.(vehicle) दुचाकी वगळता जवळपास सर्वच वाहनांकडून टोल आकारला जातो. लांब पल्ल्याच्या प्रवासात टोल हा इंधनाइतकाच मोठा खर्च ठरतो. त्यामुळे टोल व्यवस्थेत बदलाची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. या मागणीनुसार शासनाने टोल प्लाजाजवळ राहणाऱ्या नागरिकांना सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयानुसार, टोल प्लाजा पासून 20 किलोमीटरच्या अंतरावर राहणाऱ्या रहिवाशांना टोल टॅक्स भरण्यापासून पूर्ण सूट देण्यात आली आहे. जर तुमचे घर टोल नाक्यापासून 20 किमीच्या आत असेल तर तुम्हाला टोल भरावा लागणार नाही. ही सूट मिळवण्यासाठी मात्र रहिवासी पुरावा आवश्यक आहे. सप्टेंबर 2024 पासून हे धोरण लागू आहे आणि गेल्या वर्षभरात अनेक वाहनचालकांना याचा फायदा मिळू लागला आहे.

टोल सवलतीसाठी सरकारने एक खास डिजिटल प्रणाली ऍक्टिव्ह केली आहे. (vehicle)या प्रणालीला जीएनएसएस प्रणाली असे म्हणतात. वाहनातील जीपीएस-आधारित तंत्रज्ञान आणि टोल व्यवस्थापन यांची सांगड घालून या प्रणालीद्वारे वाहनांचे लोकेशन अचूकपणे तपासले जाते. वाहन टोल प्लाजाच्या 20 किलोमीटर अंतरावर असल्यास प्रणाली आपोआप टोल सूट लागू करते.याशिवाय केंद्र सरकारने महामार्ग प्रवाशांसाठी एक 3,000 रुपयांचा वार्षिक FASTag पास देखील उपलब्ध करून दिला आहे. हा विशेष पास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीतील रस्त्यांवर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी मोठा दिलासा देणारा ठरत आहे. या पासमुळे वारंवार टोल देण्याचा त्रास टळतो आणि वर्षभर एका ठराविक शुल्कात प्रवास करता येतो.
हेही वाचा :
चिकन, मासे किती काळ फ्रीजमध्ये ठेवले जाऊ शकते? कधी खराब होते? इथे वाचा
महापालिका निवडणुका फेब्रुवारीत? आचारसंहिता कधीपासून? राज्यातील बड्या मंत्र्याचा अंदाज काय?
वर्षाच्या अखेरच्या महिन्यात या राशींना मेगा लॉटरी! बाबा वेंगाची छप्परफाड भविष्यवाणी