लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना आता(sisters) नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हफ्ता एकत्रित मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील ८० लाख महिलांनी अद्यापही ई- केवायसी केलेली नाही. या लाभार्थी महिलांनी लवकरात लवकर ई केवायसी करावी यासाठी सरकारकडून मुदतवाढही देण्यात आली आहे. त्यामुळे फेब्रुवारीपासून ई- केवायसी केलेल्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्यांनी ईकेवायसी केली नसेल अशा महिलांचा योजनेचे पैसे येणं बंद होणार अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नाही त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावी असे आवाहन केले जात आहे.

राज्यातील लाडक्या बहिणींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठं गिफ्ट मिळणार (sisters)असल्याची देखील माहिती समोर आली आहे. सरकार लाडक्या बहिणींना नवीन वर्षांचे गिफ्ट आताच म्हणजे डिसेंबर महिन्यात देण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात ३००० रुपये जमा होतील. म्हणजेच एक नाही तर दोन हफ्त्याचे पैसे लाडकींना खात्यात एकत्र जमा होणार आहे. त्यामुळे लाडकींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
लाडक्या बहिणींना अद्याप नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता मिळाला नाही.(sisters) डिसेंबर महिना सुरू होऊन ९ दिवस झाले तरी लाडकींच्या खात्यात पैसे आले नाही त्यामुळे लाडक्या बहिणी या पैशाची वाट पाहत होत्या. पण आता लाडक्या बहिणींना फक्त नोव्हेंबरच नाही तर डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याचे देखील पैसे मिळणार आहेत. लाडकींच्या खात्यात दोन्ही महिन्यांच्या हफ्त्याचे ३००० रुपये जमा होतील. पण ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नाही त्यांनी हे काम करणे गरजेचे आहे. कारण हे काम पूर्ण न झाल्यास त्यांच्या खात्यात पैसे येणं बंद होईल.

घर बसल्या ई- केवायसी कशी करायची?
- सर्वात आधी ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जा.
- होम पेजवर दिसणाऱ्या ई-केवायसीवर क्लिक करा.
- ई-केवायसी फॉर्म उघडेल. या फॉर्ममध्ये लाभार्थी महिलांना त्यांचा आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.
- आधार ऑथिंटिकेशनसाठी सहमती द्या.
- ओटीपीवर क्लिक करा.
- आधार कार्डला जोडलेल्या (sisters)मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल.
- हा ओटीपी सबमिट करा.
- ईकेवायसी आधीच झाली असेल तर तसा मॅसेज देखील तुम्हाला येईल.
हेही वाचा :
चिकन, मासे किती काळ फ्रीजमध्ये ठेवले जाऊ शकते? कधी खराब होते? इथे वाचा
महापालिका निवडणुका फेब्रुवारीत? आचारसंहिता कधीपासून? राज्यातील बड्या मंत्र्याचा अंदाज काय?
वर्षाच्या अखेरच्या महिन्यात या राशींना मेगा लॉटरी! बाबा वेंगाची छप्परफाड भविष्यवाणी