चिकन बिर्याणी ही आपल्या देशात सर्वाधिक खाल्ली जाणारी डिश आहे.(biryani)एका सर्वेनुसार ऑनलाईन फूड डिलिव्हरी अॅपवर दर मिनिटाला किमान एका चिकन बिर्याणीची ऑर्डर केली जाते. यावरून भारतीयांना बिर्याणी हा पदार्थ किती आवडतो, हे लक्षात येतं. बरं, आता वर्षाचा शेवट म्हणजेच थर्टी-फर्स्ट नाईट काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे लोक चार-चार, पाच-पाच किलो बिर्याणीची ऑर्डर देत आहेत.याच पार्श्वभूमीवर एका व्हिडीओनं सध्या सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडीओ पाहून बिर्याणी लव्हर्सचा थोडा हिरमोडही झाला आहे. कारण या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती चिकन बिर्याणीमध्ये चक्क गटाराचं पाणी टाकताना दिसतोय.

हा व्हिडीओ या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.(biryani) या व्हिडीओमध्ये एका भल्यामोठ्या भांड्यात बिर्याणी असून विक्रेता त्यात गटाराचं पाणी टाकत असल्याचं दिसतं. हा व्हिडीओ आतापर्यंत १७ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. कोणी म्हणतंय या व्यक्तीला तुरुंगात टाका, तर कोणी त्याला शोधून चोप देण्याच्या भाषा करत आहे.मात्र या व्हिडीओमधील कृती जरी वाईट वाटत असली, तरी हा व्हिडीओ खरा नसून AI च्या मदतीनं तयार करण्यात आलेला आहे.
हा व्हिडीओ पाहताच संशयास्पद वाटतो. जर तुम्ही तो बारकाईने पाहिलात, (biryani)तर चमचा धरलेला हात आणि बोटांच्या हालचाली थोड्या विचित्र दिसतात. पाणीही स्पष्ट दिसत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या पदार्थांबाबत स्वच्छतेविषयी शंका असणं जरी खरं असलं, तरी कोणताही विक्रेता जाणीवपूर्वक अशा प्रकारे अस्वच्छता पसरवणार नाही.
हेही वाचा :
नवीन वर्षात गृहिणींना मोठं गिफ्ट! गॅस सिलेंडरच्या किमती कमी होणार?
भारताच्या या राज्यात दारूच्या बाटल्यांना ‘Z+’ सुरक्षा, कारण काय?
‘3 इडियट्स’नंतर आता ‘4 इडियट्स’; आमिर खानच्या चित्रपटात चौथ्याEditEdit