कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचला पाहिजे. समाजातील सर्व घटकांना समान न्याय मिळाला पाहिजे. सर्व घटक किंवा जात समूह गुन्ह्यात गोविंदाने एकीच्या भावनेतून राहिले पाहिजेत . सर्वांना आत्मसन्मानाने जगता आले पाहिजे. यासाठी संविधानाने संघ राज्यांची निर्मिती केली आहे. हे राज्य सर्वांचे असते. आणि राज्यशकट चालवणारे मंत्री गण हे सुद्धा सर्व जात समूहाचे आणि सर्वांचे असतात. त्यासाठी त्यांनी खास शपथ घेतलेली असते. पण राज्याचे एक ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ(political) यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांना ज्या त्या जातीच्या चौकटीत बसवताना “मी फक्त ओबीसी समाजाचा मंत्री आहे” असे जाहीररीत्या सांगून सामान्य माणसाला चकित करून सोडले आहे.

पाच दशकापेक्षा अधिक काळ छगन भुजबळ हे महाराष्ट्राच्या राजकारणात (political)आहेत. नगरसेवक, महापौर, आमदार ते मंत्री असा त्यांचा सत्ता वर्तुळातील प्रवास शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असा झाला आहे आणि महाराष्ट्रातील जनतेने त्यांना ओबीसी समाजाचे नेते म्हणून कधीच पाहिले नाही. किंबहुना त्यांची जात कोणती असा प्रश्नही कधी कुणाला पडला नाही. त्यांना मात्र गेल्या काही वर्षांपासून स्वतःची जात आठवणीत येऊ लागलेली आहे. सोमवारी ओबीसी समाजाच्या बैठकीत बोलताना त्यांनी मी ओबीसी समाजाचा मंत्री आहे आणि गेल्या 35 वर्षांच्या सत्ता वर्तुळात मी ओबीसी समाजाचा नेता म्हणून काम केले आहे असे स्वच्छ आणि स्पष्ट शब्दात सांगून टाकले आहे.
एक शासन म्हणून, शासनातला मंत्री म्हणून महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी छगन भुजबळ यांच्यावर आहे आणि त्यासाठी त्यांनी राज्यपालांच्याकडून घटनात्मक शपथही घेतली आहे. पण या जबाबदारीचे त्यांना भान राहिलेले नाही किंवा विस्मरण झालेले असावे. कारण ते स्वतःच त्यांच्याच शासनाला इशारा देऊ लागले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था ठेवणार नाही असे अप्रत्यक्षपणे ते जाहीररीत्या सांगू लागले आहेत.
सकल मराठा समाजाचे ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून हजारो मराठा कार्यकर्ते मुंबईत आलेले आहेत. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यांच्या आरक्षण आंदोलनामुळे ओबीसी समाजाची आरक्षणातील टक्केवारी कमी होणार किंवा मराठा समाज वाटेकरी होणार अशी भीती ओबीसी(political) समाजाला आहे आणि म्हणूनच ओबीसी समाज आक्रमक झाला आहे आणि त्याचे नेतृत्व छगन भुजबळ यांच्याकडे आलेले आहे.
मुंबईत आलेल्या मराठा कार्यकर्त्यांना मुंबईतून बाहेर काढा अन्यथा आम्ही सुद्धा लाखाच्या संख्येने मुंबईत येऊ अशी धमकी किंवा इशारा मंत्रीपदावर(political) असलेल्या छगन भुजबळ यांनी महायुती सरकारला दिला आहे. आपण महायुती सरकारचेच एक घटक आहोत, मंत्री आहोत हे ते विसरलेले दिसतात. आता तर त्यांनी मी ओबीसी समाजाचा मंत्री होतो, आहे आणि असणार आहे हे सुद्धा सांगून टाकले आहे. एक मंत्रीच अशी एका समाजापूर्ती मर्यादित भूमिका घेत असल्याचा महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिलाच प्रकार आहे.

आझाद मैदानावर महायुतीचे काही मंत्री मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी किंवा त्यांच्याशी मसुद्याविषयी चर्चा करण्यासाठी जात असतील तर मग मी ओबीसी समाजाच्या बैठकीला का जाऊ शकत नाही असा असावा भुजबळ यांनी केला आहे. मात्र ते हे विसरलेले आहेत की महायुतीचे काही मंत्री आरक्षण आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी आझाद मैदानावर जात होते.
मनोज जरांगे पाटील यांच्या बहुतांशी मागण्या सरकारने मान्य केल्यामुळे सरकारमधील एक मंत्री छगन भुजबळ हे मात्र कमालीच्या पातळीवर नाराज झालेले आहेत. आता आझाद मैदानावरील आमरण उपोषणाची यशस्वी सांगता झाली असल्यामुळे छगन भुजबळ यांना आता लाखो ओबीसींना मुंबईला आणण्याची गरज उरलेली नाही. एकूणच छगन भुजबळ यांची “जात”काल परवा पर्यंत कुणाला माहीत नव्हती आणि माहीत करून घेण्याची गरजही नव्हती. आता मात्र त्यांनीच मी ओबीसी समाजाचा नेता असल्याचे सांगून महाराष्ट्रातील उर्वरित जनतेला बे दखल केले आहे असे म्हणता येईल.
हेही वाचा :
भीषण अपघात, ३ जणांचा जागीच मृत्यू…..
मुसळधार पावसाचा हवामान विभागाकडून इशारा…
7 तारखेला लागणार आहे चंद्र ग्रहण, या दिवशी सर्व मंदिर राहतील बंद