लोकप्रिय शो ‘शार्क टँक’च्या पहिल्या पर्वात सर्वाधिक लोकप्रियता मिळवणारा परीक्षक म्हणजे अश्नीर ग्रोव्हर. शोमध्ये त्याच्या बिझनेस(Businessman) डील्सपेक्षा त्याच्या व्यक्तिमत्त्वाची आणि खुल्या स्वभावाची जास्त चर्चा झाली. त्यानंतर चाहत्यांमध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी खूप उत्सुकता निर्माण झाली. त्याची प्रेमकहाणी, संघर्ष आणि करिअरची सुरुवात याबाबत अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले.

अश्नीरने अनेक मुलाखतींमध्ये त्याच्या आयुष्यातील गोष्टी मोकळेपणाने शेअर केल्या आहेत. त्याच्या पत्नीचे नाव माधुरी जैन असून दोघांची लव्ह स्टोरी आणि सुरुवातीच्या संघर्षाची कहाणी खूप प्रेरणादायी आहे.

अश्नीर आणि माधुरी यांनी एका मुलाखतीत(Businessman) त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितलं आहे. लग्नानंतर दोघेही मुंबईत एका 1BHK फ्लॅटमध्ये राहत होते. त्या इमारतीला भेट देऊन त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. माधुरीने सांगितलं की, ‘आमच्या घरात सुरुवातीला साधं टेबलही नव्हतं. आम्ही खाली बसून जेवण करायचो. एका महिन्याच्या पगारातून आम्ही फर्निचर विकत घेतलं होतं.

अश्नीरच्या नशिबाने एकदा लकी ड्रॉद्वारे 12 लाखांची बाईक जिंकली होती. त्यावर माधुरी म्हणाली, ‘मी त्याला विचारलं की बक्षिसात अजून काय आहे तर त्याने सांगितलं की एलसीडी टीव्हीही आहे. मग मी त्याला टीव्ही आणायला सांगितलं कारण मला त्याला बाईक चालवू द्यायची नव्हती.

त्या काळात दोघेही फक्त 48 हजार रुपयांच्या पगारावर मुंबईत राहात होते. त्यापैकी 16 हजार रुपये भाडं आणि उरलेल्या पैशातून ते सिनेमा पाहायला जात असत. आम्ही अमेरिका आणि कॅनडालाही गेलो. कारण त्या वेळेस डॉलर फक्त 40 रुपयांवर होता. त्यांच्या छोट्या घरात एकच बाथरूम असल्याने अनेक वेळा दोघे एकत्र आंघोळ करत असत. कारण एकच बाथरूम असल्याने ऑफिसला वेळेवर पोहोचणं कठीण जायचं असं तिने सांगितलं.

हेही वाचा :

मनोज जरांगे “तहा” त हारले?

प्रेमसंबंधामुळे गावात बदनामी होण्याच्या भीतीने बापाने 17 वर्षीय मुलीला संपवलं

शिल्पाचा पती राज कुंद्राच्या वाढल्या अडचणी, पोलिसांकडून समन्स