भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला असून २० ते २४ एप्रिल या कालावधीत राज्याच्या विविध भागांत निसर्गाचा कोप पाहायला मिळत आहे. कडाक्याच्या उन्हात होरपळणाऱ्या महाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडपून काढले असून अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मुंबई येथील मंत्रालयाने हवामान खात्याच्या पाच दिवसीय अंदाजानंतर तातडीने सतर्कतेचा इशारा जारी केला होता. मुंबई शहर, मुंबई उपनगर , पालघर , रायगड , ठाणे आणि पुणे यांसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस पावसाचे सावट राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने सरकारी यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या हवामानात वेगाने बदल होताना दिसत आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि गारपिटीने हजेरी लावली आहे, (weather) ज्यामुळे उन्हाळ्याच्या तीव्रतेत अचानक बदल झाला आहे.
सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये काल रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून काही ठिकाणी गारांच्या वर्षावामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. (weather) त्यानंतर आता पुणे शहरातही पावसाने एन्ट्री केली आहे. पुण्यात दुपारपासूनच आकाशात ढगांची गर्दी झाली होती आणि त्यानंतर अचानक टपोऱ्या गारा पडण्यास सुरुवात झाली.
विशेषतः कोथरुड परिसरात गारांचा पाऊस सुरू होताच रस्ते पांढरे शुभ्र झाले होते.(weather) यावेळी लहान मुले आणि नागरिक गारा गोळा करण्यासाठी बाहेर पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. उन्हाळ्याच्या सुट्टीत कडक उन्हामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना या पावसामुळे उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला असून वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झाला आहे. नेहमी दुपारी १ ते ४ या वेळेत शांत असणाऱ्या पुण्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक आणि गर्दी अधिकच कमी झाल्याचे दिसून आले.
हेही वाचा
मुली नकार द्यायच्या, लग्नच जुळेना, प्रचंड नैराश्यातून दोन तरूणांनी… त्या घटनेने महाराष्ट्र हादरला
अखेर ४८ तासांनी इराणने अमेरिकेचा मोठा बदला घेतला, होर्मुझमध्ये खळबळ, एकाच्या बदल्यात तीन
शिल्पा शेट्टीच्या बहिणीचं राकेश बापटसोबत ब्रेकअप, शमिता म्हणालेली, ते आयुष्याचं एक पान