आशिया कप 2025 चा थरार मंगळवार 9 सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. या सामन्यांचा(matches) रोमांच आता केवळ मैदानापुरता मर्यादित राहणार नाही तर कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा दिसून येईल. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कने या स्पर्धेसाठी बहुभाषिक कॉमेंट्री पॅनेलची घोषणा केली आहे. ज्यामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंडसह अनेक देशांचे माजी क्रिकेटपटू आपली मत मांडतील.

इंग्लिश कॉमेंट्री पॅनलमध्ये कोण कोण?
आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या माजी क्रिकेटपटूंचा इंग्लिश कॉमेंट्री पॅनलमध्ये समावेश करण्यात आला आहे. यात भारताचे सुनील गावसकर, दिनेश कार्तिक, हर्षा भोगले, रॉबिन उथप्पा आणि रवि शास्त्री यांचा समावेश आहे. तर पाकिस्तानकडून वसीम अकरम आणि अतहर अली खान, श्रीलंकेकडून रसेल अर्नोल्ड, इंग्लंडकडून नासिर हुसैन आणि न्यूझीलंडकडून साइमन डूल यांचा इंग्लिश कॉमेंट्री पॅनलमध्ये समावेश आहे.
हिंदी कॉमेंट्री पॅनलमध्ये कोण कोण?
आशिया कपच्या हिंदी कॉमेंट्री पॅनलमध्ये वीरेंद्र सहवाग, अजय जडेजा, इरफान पठान, विवेक राजदान, अभिषेक नायर आणि सबा करीम यांचा समावेश आहे. तर यांच्यासोबत गौरव कपूर, समीर कोचर आणि आतिश ठुकराल सुद्धा आपल्या कॉमेंट्रीने सामना(matches) पाहण्याची रंगत वाढवतील.
कॉमेंट्री करण्यासाठी गावसकर उत्सुक :
सुनील गावस्करांनी म्हटले की, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियासाठी हा आशिया कप खास ठरेल. अनुभवी आणि तरुण खेळाडूंचे उत्तम मिश्रण असलेल्या या संघाचे वर्णन करताना रवी शास्त्री यांनी विश्वास व्यक्त केला की, आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी हे कॉम्बिनेशन भारतासाठी एक चांगले संकेत आहे.
भारताचे सामने कधी?
भारतीय संघांचा ग्रुप ए मध्ये समावेश असून याव्यतिरिक्त यामध्ये पाकिस्तान, यूएई आणि ओमान संघ सुद्धा आहेत.
10 सप्टेंबर 2025: भारत विरुद्ध यूएई
14 सप्टेंबर 2025: भारत विरुद्ध पाकिस्तान
19 सप्टेंबर 2025: भारत विरुद्ध ओमान
या ग्रुप ए मधील सर्वाधिक सामने जिंकलेला संघ पुढील फेरीचे सामने खेळेल.
हेही वाचा :
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नमो शेतकरी योजनेचा हप्ता खात्यात जमा
बार डान्सरसोबत पोलीस अधिकाऱ्याचा अश्लील डान्स; Video Viral
मोठी बातमी! भाजपला दे धक्का, 8 नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश