भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याबाबत(match) सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेसंदर्भात न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे. सध्या सुरु असलेल्या आशिया चषक स्पर्धेत 14 सप्टेंबर रोजी दुबई येथे होणारा भारत-पाकिस्तान टी-20 क्रिकेट सामना रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने भाष्य केलं आहे.

उर्वशी जैन यांच्या नेतृत्वाखाली कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये पहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना(match) खेळणे हे राष्ट्रीय प्रतिष्ठा आणि लोकांच्या भावनांच्या विरुद्ध आहे, असा दावा करण्यात आला होता. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात अवघ्या तीन वाक्यांमध्ये सुनावणी झाली.
भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भातील या याचिकेमध्ये क्रिकेटला राष्ट्रीय हित, नागरिकांचे जीवन किंवा सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या बलिदानापेक्षा अधिक महत्त्व दिले जाऊ शकत नाही, असं या याचिकेमध्ये म्हटलं होतं. या याचिकेद्वारे याचिकाकर्त्यांनी राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा 2025 च्या अंमलबजावणीसाठी निर्देश देण्याची देखील मागणी केलेली. ही याचिका वकील स्नेहा राणी, अभिषेक वर्मा आणि मोहम्मद अनस चौधरी यांच्यामार्फत दाखल करण्यात आली होती.
न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी आणि विजय बिश्नोई यांच्या खंडपीठासमोर ही याचिका दाखल करण्यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला. यावर न्या. जे. माहेश्वरी यांनी, “काय गरज आहे? हा सामना(match) आहे, तो होऊ द्या. सामना या रविवारी आहे, काय करता येईल?” असा सवाल याचिकाकर्त्यांच्या वकिलांना विचारला. यावर वकिलांनी, “कदाचित ही फारशी चांगली याचिका नसेल पण तुम्ही ही याचिका सुनावणीसाठी घ्यावी,” असं सांगितलं. त्यावर, “नाही, अजिबात नाही” असं उत्तर न्या. जे. माहेश्वरी यांनी दिल्याचं वृत्त आहे.
सर्वोच्च न्यायालयाने तातडीने या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिल्याने 14 तारखेला हा सामना होईल असं स्पष्ट झालं आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीयांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला होता. या तणावामुळे भारत पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही अशी भूमिका घेण्यात आलेली. याचसंदर्भात भारत सरकारने भारत आणि पाकिस्तानचे संघ एकमेकांविरुद्ध अंतरराष्ट्रीय स्पर्धा सोडल्यास क्रिकेट सामने खेळणार नाही असं स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा :
‘राज्यात PUC नसेल तर इंधनही मिळणार नाही’; परिवहनमंत्री नेमकं म्हणाले तरी काय?
‘राज्यात ‘नवीन पुणे’, ‘नवीन नाशिक’, ‘नवीन कोल्हापूर’ असा नवा…’; फडणवीसांना सल्ला
कोल्हापूरमध्ये ऑनलाईन रम्मीच्या नादात वृद्ध महिलेची हत्या; मृतदेह गोबरगॅसच्या प्लांटमध्ये टाकला