आशिया कप 2025 मध्ये क्रिकेटप्रेमींची सर्वात जास्त उत्सुकता असलेला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना(Match) रविवारी रंगणार आहे. 14 सप्टेंबर रोजी दुबईत हा हाय-वोल्टेज सामना होणार आहे. यासाठी अनेक लोक आतुरतेने वाट बघत आहेत. या हाय-वोल्टेज लढतीचे थेट प्रक्षेपण टीव्हीवर तसेच Sony LIV अ‍ॅपवर पाहता येणार आहे.

कुठे आणि कधी पाहू शकता सामना?
भारत-पाकिस्तानचा सामना(Match) रविवार, 14 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता सुरू होईल. टीव्हीवर तो Sony Sports Network चॅनल्सवर दिसेल. मोबाइल किंवा लॅपटॉपवर पाहण्यासाठी Sony LIV अ‍ॅपवर लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. यासाठी Sony LIV चे सब्स्क्रिप्शन घ्यावे लागते. या प्लॅटफॉर्मचे प्लॅन 399 रुपयांपासून (महिन्याला) सुरू होतात, तर वार्षिक सब्स्क्रिप्शन 699 रुपये (मोबाइल), 1499 रुपये (प्रीमियम) पर्यंत आहे.

मोफत कसा पाहता येईल सामना?
जर तुम्हाला थेट Sony LIV चे सब्स्क्रिप्शन घ्यायचे नसेल, तरीही काही खास टेलिकॉम कंपन्यांच्या रिचार्ज प्लॅन्ससोबत हा सामना फ्री पाहण्याची संधी मिळते.

जिओ – जिओचा ₹175 चा डेटा पॅक 28 दिवसांसाठी उपलब्ध असून त्यात 10GB डेटा दिला जातो. या पॅकमध्ये Sony LIV सह तब्बल 10 OTT अ‍ॅप्सचे मोफत सब्स्क्रिप्शन मिळते.

एअरटेल – एअरटेलच्या ₹181 च्या डेटा पॅकमध्ये 15GB डेटा आणि Airtel Xstream Play Premium चे सब्स्क्रिप्शन मिळते.

Vi (व्होडाफोन-आयडिया) – Vi चा ₹95 चा प्लॅन 14 दिवसांसाठी 4GB डेटा देतो. त्यासोबत Sony LIV चे सब्स्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे.

म्हणजेच, तुमच्याकडे जर जिओ, एअरटेल किंवा Vi चा सिम असेल आणि योग्य रिचार्ज पॅक निवडला, तर तुम्ही Sony LIV वर भारत-पाकिस्तानचा सामना मोफत पाहू शकता.

हेही वाचा :

शिंदे-फडणवीसांमध्ये पुन्हा नव्या वादाची ठिणगी

नशेत झिंगल्या; दोन तरुणींचा भररस्त्यात राडा…Video Viral

महागाईचा फटका, तळीरामांनी देशी-विदेशी दारूपासून तोंड फिरवले