गेल्या काही महिन्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात अंतर्गत मतभेद सुरू असल्याच्या चर्चा राजकीय(political) वर्तुळात सुरू आहेत. राज्याच्या नगरविकास खात्यात फडणवीस यांनी काही फेरबदल केल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयामुळे फडणवीस आणि शिंदेंमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.

राज्यात महापालिकांमध्ये सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवरून देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे(political) यांच्यात वाद निर्माण झाल्याचे वृत्त आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ड वर्ग महापालिकांमध्येही आयएएस अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. मात्र, नगरविकास विभागाने मुख्याधिकारी अथवा राज्यसेवेतील ज्येष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची प्रचलित पद्धत कायम ठेवण्याचा आग्रह धरला आहे.
अ, ब, क वर्ग महापालिकांवर यापूर्वीच सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु १९ ड वर्गाच्या महापालिकांवर परंपरेनुसार बिगर सनदी अधिकारी कार्यरत होते. आता या महापालिकांवरही सनदी अधिकारी नेमण्याचे आदेश फडणवीस यांनी दिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.दरम्यान, शिंदेंच्या जवळच्या काही अधिकाऱ्यांची ईडीकडून चौकशी झाल्यानंतर ते नाराज असल्याची चर्चाही सुरू आहे. नगरविकास विभागात फडणवीस यांचा थेट हस्तक्षेप होत असल्याने शिंदेंच्या नाराजीला अधिक उधाण आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
हेही वाचा :
भारताप्रमाणेच नेपाळमध्येही आहे सुंदर ताजमहाल!
अभिनेत्री दिशा पाटणीच्या घरावर गोळीबार
सावधान! तुम्हीसुद्धा पॅरासिटामोल घेताय? एक चूक पडू शकते महागात!