बॉलिवूड अभिनेत्री(actress) दिशा पाटणीच्या बरेली येथील घरावर गोळीबार झाला आहे. या गोळीबाराची जबाबदारी रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार टोळीने घेतली आहे. या गोळीबारात कुणीही जखमी किंवा मृत्यूमुखी पडलेलं नाही. सोशल मीडियावर पोस्ट करत बरार टोळीने जबाबदारी घेतली आहे. ही पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे. दरम्यान, या घटनेने उत्तर प्रदेशात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

या गोळीबाराचं कारणही व्हायरल पोस्टमध्ये देण्यात आलं आहे. संत प्रेमानंद महाराज यांचा अपमान केला म्हणून याच्या उत्तरात हा गोळीबार केल्याचे या पोस्टमध्ये म्हटलं आहे. मी वीरेंद्र चरण, महेंद्र सरन (डेलाना), बंधुंनो, आज खुशबू पटनी/दिशा पाटणीच्या घरी (विला क्रमांक 40, सिव्हिल लाइन्स बरेली, उत्तर प्रदेश) आम्हीच गोळीबार केला होता.
तिने आमचे प्रेमानंदजी महाराज आणि अनिरुद्धाचार्यजी महाराज यांचा अपमान केला आहे. तिने आमच्या सनातन धर्माचा अपमान करण्याचा प्रयत्न केला होता. आमच्यी देवी देवतांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. हा तर एक फक्त ट्रेलर होता. पुढील वेळी जर तिनं किंवा इतर कुणीही आमच्या धर्माबद्दल काही अभद्र कृत्य केलं तर आम्ही त्यांच्या घरातून कुणालाही जिवंत सोडणार नाही.
हा मेसेज फक्त दिशासाठीच नाही तर चित्रपटसृष्टीतील सर्व कलाकार आणि त्यांच्याशी संबंधित लोकांसाठी आहे. भविष्यात जर कुणी आमचा धर्म आणि संतांच्या विरुद्ध अपमानजनक कृत्य केलं तर त्याला या कृ्त्याचे परिणाम भोगण्यास तयार राहावे लागेल. धर्माचे रक्षण करण्यासाठी आम्ही कोणतीही पातळी गाठू शकतो. आम्ही कधीही मागे हटणार नाही. आमच्यासाठी आमचा धर्म आणि समाज एक आहे आणि त्यांचं रक्षण करणं हे आमचं पहिलं कर्तव्य आहे.
दरम्यान, या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. दिशा पाटणीच्या(actress) घरासाठी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. हा गोळीबार रात्री उशीरा झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक टीम दाखल झाली. घराच्या बाहेरून काही रिकामे खोके हस्तगत करण्यात आले. एसएसपीने याबाबत माहिती देताना सांगितले की गोळीबाराच्या घटनेचा तपास गुन्हे शाखेला सोपवण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.
हेही वाचा :
Hyundai Creta Electric चा ‘हा’ व्हेरिएंट क्षणार्धात होईल तुमचा,
आजचा शनिवार राशींसाठी भाग्यशाली! शनिदेव लवकरच टेन्शन दूर करणार,
टक्कलपणा येत चाललाय? मग आता चिंता सोडा, शॅम्पूत हे पदार्थ मिसळून लावा