दीर्घकाळ कीटकनाशकांच्या संपर्काचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम पुन्हा एकदा चर्चेत आला असून, विशेषतः धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाशी त्याचा संभाव्य संबंध असल्याचे काही संशोधनांमधून सूचित झाले आहे. मात्र हा संबंध अद्याप ठोसपणे सिद्ध झालेला नसल्याने तज्ज्ञांनी याकडे सावधपणे पाहण्याचा सल्ला दिला आहे.

अभ्यासांनुसार, कीटकनाशके हे एक संभाव्य पर्यावरणीय जोखीम घटक मानले जात असले तरी फुफ्फुसाचा कर्करोग होण्यामागे त्यांची भूमिका धूम्रपान किंवा वायू प्रदूषणाइतकी स्पष्ट आणि सातत्यपूर्ण नाही. (lung cancer)काही महामारीशास्त्रीय संशोधनांमध्ये दीर्घकाळ कीटकनाशकांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींमध्ये कर्करोगाचा धोका वाढलेला दिसून आला आहे. एका अभ्यासात तर अशा व्यक्तींमध्ये हा धोका इतरांच्या तुलनेत दोन ते चार पट जास्त असल्याचे आढळले.
विशेषतः शेती क्षेत्रातील कामगारांवर करण्यात आलेल्या अभ्यासांमध्ये, दीर्घकालीन व्यावसायिक संपर्कामुळे धोका वाढण्याची शक्यता अधोरेखित झाली आहे. मात्र सर्वच अभ्यासांमध्ये एकसारखे निष्कर्ष समोर आलेले नाहीत. काही विश्लेषणांमध्ये हा संबंध कमकुवत किंवा बदलणारा दिसून येतो. (lung cancer) यावरून कीटकनाशकांचा प्रकार, संपर्काचा कालावधी आणि त्याची तीव्रता यावर परिणाम अवलंबून असू शकतो.तज्ज्ञांच्या मते, धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींमध्ये पर्यावरणीय आणि व्यावसायिक घटक अधिक महत्त्वाचे ठरतात. कीटकनाशकांची फवारणी करताना ही रसायने श्वसनमार्गातून किंवा त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करू शकतात. तरीही, वायू प्रदूषण, सेकंड-हॅंड स्मोक, घरातील इंधनाचा धूर आणि आनुवंशिक घटक हे अजूनही अधिक ठोस जोखीम घटक मानले जातात.
भारतातील परिस्थिती लक्षात घेतली असता, शेतीत मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकांचा वापर आणि सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीत असलेली तफावत यामुळे काही भागांमध्ये दीर्घकालीन संपर्काचा धोका वाढतो. (lung cancer) त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने कीटकनाशकांकडे एक संभाव्य पर्यावरणीय कर्करोगकारक म्हणून पाहिले जात आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, केवळ कीटकनाशकांचा संपर्क हा कर्करोगाचे एकमेव कारण ठरत नाही. मात्र दीर्घकाळ संपर्कात राहणाऱ्या, विशेषतः धूम्रपान न करणाऱ्या आणि व्यावसायिक कारणांमुळे संपर्कात असलेल्या व्यक्तींमध्ये तो एक पूरक जोखीम घटक ठरू शकतो. त्यामुळे सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि जागरूकता वाढवणे हीच सध्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
हेही वाचा
राहुरी-बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांचं भवितव्य ठरणार