धार्मिकदृष्ट्या रुद्राक्षाच्या माळेला मोठं महत्व आहे. (importance)त्याचप्रमाणे वैज्ञानिकदृष्ट्या देखील त्याचे आरोग्यदायी असंख्य फायदे आहेत, काय आहेत यामागील शास्त्रीय कारणं जाणून घेऊयात.

रुद्राक्षाच्या माळेचं महत्व
काय आहे दंतकथा
रुद्राक्षाच्या माळेचे आरोग्यदायी फायदे
धार्मिकदृष्ट्या रुद्राक्षाच्या माळेला मोठं महत्व आहे. भगवान शंकराचं प्रतीक म्हणून अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने रुद्राक्षाची माळ गळ्यात घालतात किेंवा देवघरात पुजायला ठेवतात. (importance)काही जण नामस्मरण करण्याकरिता देखील रुद्राक्षाच्या माळा घेतात. यामागे एक दंतकथा सांगितली जाते. असं म्हटलं जातं की, त्रिपूरासूर नावाचा नावाचा एक राक्षस होता. या राक्षसाने देव आणि मानव जातीला खूप त्रास दिला होता. या असूराला दैवी शक्ती प्राप्त होती. देवकुळातील कोणताही देव या असूराचा वध करण्यास सक्षम नव्हता. त्यानंतर सर्व ऋषी आणि देव महादेवांच्या भेटीस गेले. त्यांना या सगळ्याची कल्पना दिली. त्यावेळी महादेव ध्यानस्त अवस्थेत होते. जेव्हा महादेवांनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले आणि हे अश्रू पृथ्वीवर जिथे जिथे पडले त्या ठिकाणी रुद्राक्षाची झाडं निर्माण झाली. जेव्हा त्रिपूरासूराने देवकुळाला आणि मानव जातीला त्रास दिल्याचं महादेवांना कळलं त्यानंतर क्रोधीत झालेल्या महादेवांनी त्याचा त्रिपूरासूराचा वध केला. त्याच्या वधानंतर महादेवांनी शांत होण्यासाठी त्यांनी रुद्राक्ष धारण केले, अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळेच महादेवांचं प्रतीक म्हणून भाविक रुद्राक्षाच्या माळेला फार महत्व देतात.
काय सांगतं विज्ञान ?
रुद्राक्षाच्या माळेचं वैज्ञानिकदृष्ट्या देखील मोठं महत्व आहे. वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार करायचा झाल्यास रुद्राक्षाच्या माळेचे असंख्य आरोग्यदायी फायदे आहेत. शार्पनर या युट्युब चॅनेलने दिलेल्या माहितीनुसार, IIT बनारस येथील हिंदु विद्यापीठात रुद्राक्षाच्या माळेवर संशोधन करण्यात आलं. त्यातूनच महत्वाची माहिती समोर आली. रुद्राक्षाच्या माळेचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम दिसून येतो. संशोधनानुसार असं सांगितलं गेलं की, रुद्राक्षाची माळ घातल्याने ताण भिती आणि चिंता दूर होते आणि मन शांत होतं. रुद्राक्षामधील असलेल्या साकारात्मक ऊर्जेचा शरीरावर चांगला परिणाम होतो.
विज्ञानाने हे मान्य केलं आहे की, रुद्राक्षाच्या माळेचा जप केल्याने एकाग्रता वाढते. असंही सांगितलं गेलं आहे की, या माळेचा जप केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतं. रुद्राक्षाच्या माळेमुळे मानसिक आरोग्य देखील सुधारतं. आपला ऑरा सुधारण्यास देखील मदत होते.
खरे रुद्राक्ष ओळखायचं कसं ?
सध्याच्या कलियुगात भाविकांच्या भावनांशी खेळलं जातं अशी अनेक पुजेचं साहित्य विकणारी दुकानं आहे. तुम्हालाही रुद्राक्ष घ्य़ायचे आहेत पण खरे रुद्राक्ष कसं ओळखायचं हे माहीत नसेल तर ही सोपी ट्रीक खास तुमच्यासाठी. एक ग्लास पाण्यात रुद्राक्ष टाकून पाहा, जर रुद्राक्ष वजनाने खाली गेला तर ते खरे आहेत. तेच जर रुद्राक्ष पाण्यावर तरंगत असेल तर तुमची फसवणूक करण्यात आलेली आहे. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहावं यासाठी तुम्ही देखील रुद्राक्षाच्या माळेचा वापर करु शकता.
हेही वाचा :
Hyundai Creta Electric चा ‘हा’ व्हेरिएंट क्षणार्धात होईल तुमचा,
आजचा शनिवार राशींसाठी भाग्यशाली! शनिदेव लवकरच टेन्शन दूर करणार,
टक्कलपणा येत चाललाय? मग आता चिंता सोडा, शॅम्पूत हे पदार्थ मिसळून लावा