सणांचा गोडवा वाढवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मुगडाळ(festivals) पायसम बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

दक्षिण भारतात बनवले जाणारे सर्वच पदार्थ जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहेत.(festivals) सुगंधी आणि चविष्ट मसाल्यांचा वापर करून बनवलेले पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात. जगभरातील लाखोंच्या संख्येने पर्यटक जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी दक्षिण भारतात येतात. तिथे बनवले जाणारे गोड, तिखट आणि इतर पदार्थांची चव कायमच सुंदर लागते. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीने मुगडाळ पायसम बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मुगाची डाळ सहज पचन होते. याशिवाय वेगवेगळ्या पदार्थांपासून पायसम बनवले जातात. गुळाचा वापर करून बनवलेले चविष्ट पायसम लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.हा पदार्थ अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी फरार खान यांच्यासाठी बनवला होता. चला तर जाणून घेऊया मुगडाळ पायसम बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
सकाळच्या नाश्त्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा गव्हाच्या पिठाचा कुरकुरीत खाकरा! विकतपेक्षा लागेल सुंदर चव
साहित्य:
साबुदाणे
मुगडाळ
गूळ
सुका मेवा
तूप
दूध
वेलची पावडर
५ मिनिटांमध्ये घरी बनवा केरळस्टाईल जाळीदार सॉफ्ट अप्पम, झटपट तयार होतील सकाळचा नाश्ता
कृती:
मुगडाळ पायसम बनवण्यासाठी सर्वप्रथम, मुगडाळ काहीवेळ पाण्यात भिजत ठेवा.(festivals) त्यानंतर साबुदाणे स्वच्छ धुवून काहीवेळ पाण्यात भिजत ठेवा.
कुकरच्या भांड्यात साबुदाणे आणि मुगाची डाळ टाकून एकत्र शिजवून घ्या. डाळ शिजवताना त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालावे.
कढईमध्ये तूप गरम करून त्यात सुका मेवा भाजून काढून घ्या. त्यानंतर त्यात दूध ओतून दुधाला एक उकळी काढून त्यात शिजवून घेतलेले साबुदाणे आणि डाळ टाकून व्यवस्थित मिक्स करा.
त्यानंतर त्यात किसून घेतलेलं गूळ टाकून व्यवस्थित मिक्स करा. गूळ पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर त्यात सुका मेवा आणि वेलची पावडर टाकून मिक्स करा.
सगळ्यात शेवटी चमचाभर तूप टाकून मिक्स करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले मुगडाळ पायसम.
हेही वाचा :
राज्य सरकारचा मोठा निर्णय! ७० हजार मराठा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अचानक बंद
‘त्यांना बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर…’; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
नेमकं विक्की जैनला झालं तरी काय? डाव्या हाताला सलाईन, उजव्या हाताला फ्रॅक्चर