भारत- पाकिस्तान मॅचला शिवसेना UBT पक्षाने जाहीर विरोध केला आहे. उद्या शिवसेना(political) UBT पक्षाकडून माझं कुंकू, माझा देश अभियान राबवण्यात येणार आहे. हर घर से सिंदूर गोळा करून मोदींना पाठवण्यात येणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं. ‘ ज्या पाकिस्तानसोबत आपण युद्ध पुकारलं होतं आता त्याच पाकिस्तानसोबत आपण मॅच खेळतोय.

सध्या देशभक्तीची(political) थट्टाच नाही तर देशभक्तीचा व्यापार चालवलाय. त्यांना व्यापारापुढे आता देशाचीही काही किंमत राहिली नाहीये. माझा राजनाथ सिंह आणि अमित शहांना प्रश्न आहे की पाकिस्तानसोबतचं युद्ध थांबवलंय का?, पाकिस्तानबद्दल आपली नेमकी भूमिका तरी काय आहे?,’ असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे.

‘अजुन एक संधी आहे की जे जगभरात शिष्टमंडळ पाठवून पंतप्रधानांना जे जमलेलं नाही, ते एका मॅचवर निर्बंध टाकुन तुम्हाला जमु शकतं. जोपर्यंत पाकिस्तान या कारवाया थांबवत नाहीत. तोपर्यंत आम्ही पाणीच काय तर कोणतेही संबंध पाकिस्तानसोबत ठेवणार नाहीत. हे जगाला दाखवून दिलं पाहिजे. हीच भूमिका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची होती.

जावेद मियादाद आला होता तेव्हा बाळासाहेबांनी त्यालाही ठणकावून सांगितलं होतं. हा सगळा फालतुपणा बंद कर. जोपर्यंत पाकिस्तान आमच्या देशाशी नीट वागत नाही. तोपर्यंत क्रिकेट वगैरे मी माझ्या देशात होऊ देणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

ते पुढे म्हणाले की, ‘मला खरंच सुषमा स्वराज यांची आठवण होते. तेव्हा त्या परराष्ट्रमंत्री होते. आज सरदार पटेल हे पंतप्रधान हवे होते. आज सरदार पटेल असते तर पाकिस्तान शिल्लक राहिला नसता आणि पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याचाही प्रश्न शिल्लक राहिला नसता.’ ‘जर मातोश्रीवर जावेद मियादाद येण्यावरुन भाजप(political)टीका करत असेल तर मला विचारायचंय की त्यांना बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर शंका घ्यायतीय का? भाजपची तेवढी लायकी आहे का?’ असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे.

‘एक गोष्ट मला दिलासादायक वाटते की, काही मीनिटांत आधी भारत-पाकिस्तानच्या मॅचची तिकीटविक्री हाउसफुल्ल व्हायची मात्र, अजुन हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. मला मोदींना प्रश्न विचारायचा आहे की, निरज चोप्रा जर देशद्रोही असेल तर जय शहा पण देशद्रोही ठरणार का?. उद्या जे लोक तिथे मॅच पाहायला जातील ते देशद्रोही आहेत का? उद्या जे टीव्हीवर मॅच बघणार ते देशद्रोही ठरणार का?’ असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे.

हेही वाचा :

Ind vs Pak Asia Cup 2025 Live सामना ‘असा’ पहा मोबाईलवर फ्री! 

मनसेला सर्वात मोठा धक्का! बड्या नेत्यानी दिला पदाचा राजीनामा

राज्य सरकारचा मोठा निर्णय! ७० हजार मराठा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अचानक बंद