राज्य शासनाने घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामुळे मराठा समाजातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. सारथी संस्थेमार्फत मिळणारी शिष्यवृत्ती थांबवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असून, यामुळे राज्यातील जवळपास ७० हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून(Scholarships) वंचित राहणार आहेत. यामध्ये फक्त कोल्हापूर जिल्ह्यातीलच सुमारे १७ हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

सारथी संस्थेमार्फत आठवीतील NMMS परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मराठा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात होती. त्यांना दरमहा ९०० रुपये शिष्यवृत्ती(Scholarships) स्वरूपात मिळत असे, जी चार वर्षांसाठी लागू होती. या शिष्यवृत्तीचा लाभ वार्षिक उत्पन्न १.५ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना मिळत होता.
आतापर्यंत शिष्यवृत्ती देण्यासाठी सरकारला अंदाजे ४० कोटी रुपये खर्च करावे लागले असते. मात्र, सरकारने अचानक हा लाभ बंद करण्याचा निर्णय घेतला.
मराठा महासंघाचा तीव्र विरोध :
या निर्णयाविरोधात अखिल भारतीय मराठा महासंघाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महासंघाने शुक्रवारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन दिले. यावेळी वसंतराव मुळीक, शैलेजा भोसले आदी उपस्थित होते. मुळीक यांनी सांगितले की, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होईल आणि त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागेल.
महासंघाने सरकारला इशारा दिला आहे की, १५ दिवसांच्या आत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू.
विद्यार्थ्यांची चिंता वाढली :
या निर्णयामुळे ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या मागास मराठा विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. शिष्यवृत्ती थांबल्याने त्यांचे शिक्षण, राहणीमान आणि पुढील करिअरवर परिणाम होणार आहे. “शासनाचा हा एकतर्फी निर्णय नेमका कोणत्या हेतूने घेतला गेला?” असा सवालही मराठा संघटनांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा :
नशेत झिंगल्या; दोन तरुणींचा भररस्त्यात राडा…Video Viral
Ind vs Pak Asia Cup 2025 Live सामना ‘असा’ पहा मोबाईलवर फ्री!
मनसेला सर्वात मोठा धक्का! बड्या नेत्यानी दिला पदाचा राजीनामा