‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेचा पती आणि उद्योजक विक्की जैन(Vicky Jain) आता केवळ बिझनेसमॅन म्हणूनच नाही तर सेलिब्रिटी म्हणूनही ओळखला जातो. त्याची स्वतःची मोठी फॅन फॉलोइंग आहे. मात्र सध्या त्याच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विक्कीला अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्याच्या हातावर प्लास्टर चढवलेलं दिसत आहे.

सोशल मीडियावर विक्की जैनचे(Vicky Jain) काही फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यात तो हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेला दिसतोय. डाव्या हाताला सलाइन आणि उजव्या हाताला प्लास्टर असतानाही त्याच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे हसू कायम आहे. हे फोटो पाहून चाहत्यांमध्ये चिंता वाढली आहे.

विक्कीच्या तब्येतीबाबतची माहिती ‘लाफ्टर शेफ’ शोमधील त्याचा मित्र समर्थ जुरेलने दिली. समर्थने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात तो विक्कीच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये अंकिता लोखंडेही विक्कीच्या जवळ उभी असल्याचं पाहायला मिळतं.

‘बिग बॉस १८’ या रिअॅलिटी शोमध्ये विक्की पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला. या शोदरम्यान अंकिता आणि विक्की यांचं आंबट-गोड नातं सर्वांसमोर आलं होतं. अनेकदा त्यांच्यात मतभेद झाले, वाद झाले, इतकंच नव्हे तर शो संपल्यानंतर हे दोघं वेगळे होतील, अशी चर्चा रंगली होती. पण आजही ही जोडी एकत्र असून चाहत्यांचं प्रेम त्यांच्यावर तसंच कायम आहे. यानंतर हे जोडपं ‘लाफ्टर शेफ’ या कार्यक्रमातही एकत्र दिसत आहे. सध्या मात्र विक्कीच्या प्रकृतीबाबत चाहत्यांमध्ये चिंता असून सोशल मीडियावर सर्वजण त्याच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

हेही वाचा :

Ind vs Pak Asia Cup 2025 Live सामना ‘असा’ पहा मोबाईलवर फ्री! 

मनसेला सर्वात मोठा धक्का! बड्या नेत्यानी दिला पदाचा राजीनामा

राज्य सरकारचा मोठा निर्णय! ७० हजार मराठा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अचानक बंद