पंख, एसी खाली न बसता वारंवार तुम्हाला जर थंडी वाजत असते, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.(medical)शरीरात निर्माण झालेली विटामिनची कमतरता आरोग्यासाठी घातक ठरते.


एसी पंखे बंद असून सुद्धा सतत थंडी वाजते? आरोग्यासंबंधित उद्भवू शकतात ‘हे’ गंभीर आजार

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा हिवाळ्यात थंडी वाजणे अतिशय सामान्य आहे.(medical) पण काहींना वर्षाच्या बाराही महिने थंडी वाजते. जेवणानंतर लगेच अंगावर काटा येतो, तर कधी अचानक झोपेत सुद्धा थंडी वाजते. तसेच एसीच्या थंडीत गेल्यानंतर थरथरी भरते. पण बऱ्याचदा शरीरात निर्माण झालेल्या थकव्यामुळे किंवा इतर आरोग्यासंबंधित सवयींमुळे कायमच थंडी वाजते. वातावरणात होणारे बदल, जंक फूडचे सेवन, पचनाच्या समस्या आणि पोषक घटकांचा अभाव निर्माण झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतो. कोणत्याही कारणाशिवाय जर तुम्हाला सतत थंडी वाजत असेल तर ही लक्षणे आरोग्यासंबंधित गंभीर आजाराची आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात कोणत्या विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर वारंवार थंडी वाजते? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.
आतड्यांमध्ये साचून राहिलेला मैदा आणि विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी ‘या’ पाण्याचे करा सेवन, शरीर होईल स्वच्छ

विटामिन बी 12 ची कमतरता:
शरीरासाठी विटामिन बी १२ अतिशय महत्वाचे आहे.(medical) पण शरीरात या विटामिनची कमतरता निर्माण झाल्यास आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. विटामिन बी १२ कमी झाल्यानंतर पेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. यामुळे शरीरात सतत थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. याशिवाय वारंवार थंडीसुद्धा वाजते. विटामिन बी १२ शरीरातील लाल रक्तपेशी योग्यरीत्या तयार होण्यासाठी मदत करतात.

वजन कमी होणे:
शरीरातील चरबी नैसर्गिक इन्सुलेटर मानली जाते. यामुळे शरीरात उष्णता कायम टिकून राहते. पण बऱ्याचदा शरीरात जमा झालेल्या चरबीमुळे आरोग्याला हानी पोहचते. वजन कमी झाल्यानंतर शरीरातील चरबीचा साठा कमी होऊन जाते, ज्यामुळे सतत थंडी वाजते. थंडी वाजल्यानंतर लगेच अंगावर शहारे येतात. त्यामुळे वजन कायमच नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे.

पाण्याची कमतरता:
शरीरासाठी पाणी अतिशय महत्वाचे आहे. पण दैनंदिन आहारात कमीत कमी पाण्याचे सेवन केल्यास शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते आणि आरोग्याला हानी पोहचते. पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन होण्याची जास्त शक्यता असते. ज्यामुळे सतत थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. याशिवाय अंगावर शहारे येतात.

रक्ताभिसरणात अडथळे निर्माण होणे:
शरीरातील प्रत्येक अवयवाला योग्य प्रमाणात रक्त पुरवठा होणे आवश्यक आहे. पण बऱ्याचदा रक्तप्रवाहात अनेक अडथळे निर्माण होतात. रक्तभिसरण कमकुवत झाल्यानंतर हातांपर्यंत रक्त योग्य रित्या पोहचत नाही. तसेच हे हृद्यासंबंधित आजाराचे गंभीर लक्षण सुद्धा असू शकते.

FAQs (संबंधित प्रश्न)
वारंवार थंडी वाजण्याची कारणे:

शरीरातील पेशींना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने अशक्तपणा येतो आणि थंडी वाजते.निरोगी रक्तपेशी तयार होण्यासाठी बी १२ आवश्यक असते. याच्या कमतरतेमुळे अशक्तपणा आणि सतत थंडी जाणवू शकते.

जीवनशैली संबंधित कारणे?

कमी चरबीमुळे शरीरात उष्णता टिकून राहत नाही, त्यामुळे थंडी जास्त जाणवते.झोप पूर्ण न झाल्यास शरीराला आराम मिळत नाही, तापमान नियंत्रित होत नाही आणि ऊर्जा कमी निर्माण होते.

हेही वाचा :

राज्य सरकारचा मोठा निर्णय! ७० हजार मराठा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अचानक बंद

‘त्यांना बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर…’; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

नेमकं विक्की जैनला झालं तरी काय? डाव्या हाताला सलाईन, उजव्या हाताला फ्रॅक्चर