आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये अ‍ॅपल जॅम(jam) बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांना खूप जास्त आवडेल. याशिवाय जॅम बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. जाणून घ्या अ‍ॅपल जॅम बनवण्याची कृती.

निरोगी राहण्यासाठी कायमच आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. आहारात पालेभाज्या, फळे, धान्य किंवा इतर अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. प्रत्येक(jam) घरात जॅम असतोच. वेगवेगळ्या फळांचा वापर करून बनवलेला जॅम चवीला अतिशय गोड आणि टेस्टी लागतो. लहान मुलांना जॅम खायला खूप जास्त आवडतो. पण बाजारात विकत मिळणाऱ्या जॅममध्ये मोठ्या प्रमाणावर आर्टिफिशियल प्रिझर्व्हेटिव्ह्ज असतात. याशिवाय जॅमचा रंग अतिशय डार्क दिसण्यासाठी खाण्याच्या रंगाचा वापर केला जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आर्टिफिशियल प्रिझर्व्हेटिव्ह्जचा वापर न करता अ‍ॅपल जॅम बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सफरचंद खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. त्यामुळे कमीत कमी साहित्यामध्ये आम्ही तुम्हाला अ‍ॅपल जॅम बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

साहित्य:
सफरचंद
साखर
लिंबाचा रस
पाणी

कृती:
अ‍ॅपल जॅम बनवण्यासाठी सर्वप्रथम, सफरचंद स्वच्छ धुवून त्यांची साल काढून घ्या. त्यानंतर लहान लहान तुकडे करा.
पॅनमध्ये सफरचंद आणि अर्धा कप पाणी घालून मंद आचेवर शिजवून घ्या. तयार केलेले मिश्रण चमच्याने सतत मिक्स करत राहा.
सफरचंद पूर्णपणे मॅश करून घ्या. याशिवाय तुम्ही मिक्सरच्या सुद्धा वापर करू शकता.
सफरचंद पूर्णपणे शिजल्यानंतर त्यात साखर घालून व्यवस्थित मिक्स करा. मंद आचेवर जॅम तयार करावा.
जॅम हळूहळू घट्ट होण्यास सुरुवात झाल्यानंतर त्यात लिंबाचा रस मिक्स करून घ्या. यामुळे जॅम लवकर खराब होणार नाही.
तयार केलेला जॅम थंड करून काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला अ‍ॅपल जॅम.

हेही वाचा :

फक्त 8 हजार रुपयांच्या EMI वर मिळेल Tata Tiago EV

चपाती की भाकरी सगळ्यात जास्त पोषक घटक कशात असतात ?

आजचा शुक्रवार राशींसाठी भाग्यशाली! भगवान जगन्नाथाचं असणार लक्ष,