मेष रास
मेष राशीच्या लोकांनो आज संततीच्या दृष्टीने थोडी(careful) काळजी घ्यावी लागेल, दुसऱ्यांना काही कळू न देता काही गोष्टी करणार आहात

वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांनो आज आर्थिक(careful) परिस्थिती मनाजोगती राहिल्यामुळे अनेक बेत ठरवाल. वडिलोपार्जित इस्टेटचे प्रश्न बरेचसे मार्गी लागतील

मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांनो आज घरामध्ये अचानक उद्भवणाऱ्या समस्यांना धीराने तोंड द्याल, नोकरी व्यवसायात वरिष्ठांची मर्जी राहील

कर्क रास
कर्क राशीच्या लोकांनो आज तुम्ही साकारलेल्या नवीन योजनांना त्यांची दाद मिळेल, परदेश गमनाच्या संधी मिळतील

सिंह रास
सिंह राशीच्या लोकांनो आज सर्व कामे एकट्याने करणे शक्य नसल्यामुळे इतरांवर विश्वास ठेवणे भाग पडेल, महिलांचा घरामध्ये जास्त वेळ जाईल

कन्या रास
कन्या राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायामध्ये जेवढे काम कराल त्या मानाने समाधान कमी मिळेल, धंद्यामध्ये स्पर्धक निर्माण होतील

तूळ रास
तूळ राशीच्या लोकांनो आज अनावश्यक कामासाठी बरीच शक्ती खर्च होईल, समोरच्या व्यक्तीचे अंतरंग जाणून घ्याल

वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज तुमच्या अचूक अंदाजाचा तुम्हाला दैनंदिन जीवनात उपयोग होईल, वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घ्याल

धनु रास
धनु राशीच्या लोकांनो आज घरात आनंदी आणि उत्साही वातावरण असेल. चैनीच्या गोष्टींची खरेदी करण्याकडे कल राहील

मकर रास
मकर राशीच्या लोकांनो आज आपली जबाबदारी टाळण्याकडे कल राहील, महिलांनी स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला हवे

कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांनो आज तुमच्या मनातील संघर्षाची खळबळ समोर पाहणाऱ्याला जाणवणार नाही, आज तुमचा राग तुम्हाला आवरणार नाही

मीन रास
मीन राशीच्या लोकांनो आज कामाच्या ठिकाणी प्रचंड धाडस दाखवाल, प्रचंड आत्मविश्वासाने समोरच्या माणसाला आपलेसे करून घ्याल

हेही वाचा :

तरुणांनो… बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी!

22 सप्टेंबरनंतरदेखील कमी होणार नाही पॅकेट दुधाचे दर? अमूलनेही केली घोषणा

दोन दिवसांपूर्वीच पित्याचा मृतदेह सापडला, अन् आज 4 वर्षांची चिमुरडी…