२२ सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या GST 2.0 सुधारणांबाबत अमूलने मोठे स्पष्टीकरण दिले आहे. पॅकेज्ड पाउच दुधाच्या(milk) किमतीत कोणताही बदल होणार नाही असे कंपनीने म्हटले आहे. अमूलने म्हटले आहे की पाउच दुधावर नेहमीच शून्य टक्के जीएसटी आकारला जात आहे. त्यामुळे त्यात कोणतीही कपात किंवा वाढ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

गुजरात सहकारी दूध(milk) विपणन महासंघ चे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, “ताज्या पाऊच दुधाच्या किमतीत कोणताही बदल प्रस्तावित नाही. कारण त्यावर कधीही जीएसटी लावण्यात आला नाही. ते नेहमीच शून्य टक्के कराच्या कक्षेत राहिले आहे.”
हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा काही माध्यमांमध्ये असा दावा करण्यात आला होता की पॅकेज्ड वा पाऊच दूध प्रति लिटर ३ ते ४ रुपयांनी स्वस्त होऊ शकते. सध्या मेहता यांनी हे वृत्त खोटे असल्याचे म्हटले आहे. त्यांनी स्पष्ट केले की फक्त लाँंग लाईफ UTH (UTH- अल्ट्रा हाय टेम्परेचर प्रोसेसिंग) दूध स्वस्त होईल. आतापर्यंत त्यावर ५% जीएसटी आकारला जात होता, जो आता २२ सप्टेंबरपासून पूर्णपणे रद्द केला जाईल.
३ सप्टेंबर रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी GST कौन्सिलच्या बैठकीत जीएसटी दर सुधारणांची घोषणा केली. त्याचे वर्णन ‘पुढील पिढीतील GST सुधारणा’ असे करण्यात आले. ५६ व्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत १२% आणि २८% स्लॅब एकत्र करून फक्त ५% आणि १८% असे दोन दर करण्यात आले.
अमूल(milk) आणि मदर डेअरीसारख्या दूध सहकारी संस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी म्हटले आहे की पनीर, चीज, तूप, बटर, पेये आणि आईस्क्रीम यासारख्या उत्पादनांवरील कर कमी केल्याने वापर वाढेल आणि शेतकऱ्यांना थेट फायदा होईल.
सरकारचे आभार मानताना जयेन मेहता म्हणाले, “हे पाऊल गुजरातमधील ३६ लाख शेतकरी कुटुंबांसाठी आणि देशभरातील १० कोटी दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा देणारा उपाय आहे.” त्याच वेळी, उद्योगाचा असा विश्वास आहे की या सुधारणांमुळे ग्राहकांना दिलासा मिळेल, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि दुग्ध क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील.
हेही वाचा :
भारत-पाक क्रिकेट सामन्यावरुन खासदार संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा
सुनितानं केला गोविंदाच्या गुपिताचा धक्कादायक खुलासा म्हाणाली ‘फक्त सोनालीच वाचली…’
बाईकस्वाराची धडक अन् चिमुकल्याच्या डोळ्यांसमोर वडिलांनी सोडले प्राण; Video Viral