सोशल मीडियावर सध्या एक हृदयद्रावक अपघाताचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमधील घटना दुःखद असून यातील दृश्यांनी आता सर्वांनाच भावुक केलं आहे. आपल्या आयुष्यात आपल्यावर निस्वार्थी प्रेम करणारे फार कमी लोक असतात आणि यातीलच ठरलेले दोन लोक म्हणजे आपले आई-वडील! आईची माया जगापासून काही लपली नाही पण वडिलांचा(Father) आधार आणि त्यांचे प्रेमही जग ओळखून आहे.

वडिलांचा(Father) हात डोक्यावर जाणे म्हणजे आपला आधार गेल्यासारखं आहे आणि अशीच काहीशी घटना सध्या केरळमधील मलप्पुरम येथे घडून आली आहे. व्यक्ती आपल्या लहान मुलासोबत रास्ता ओलांडत असतानाच एक भरधाव दुचाकी त्याला चिरडून जाते आणि यातच त्याचा मृत्यू होतो. आपल्या वडिलांचा इतक्या दुःखदरित्या झालेला मृत्यू मुलगा आपल्या उघड्या डोळ्यांनी बघतो. ही घटना आता सर्वांनाच भावुक करत असून अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे.

माहितीनुसार, सदर घटना ९ सप्टेंबरच्या रात्री घडून आली. माणूस त्याच्या मुलासह रस्त्या ओलांडत होता, अर्धा रास्ता पार केल्यांनतर एक भरधाव दुचाकी अचानक तिथे येते आणि व्यक्तीला चिरडून पुढे जाते. दुचाकीस्वार ब्रेक लावण्याचा प्रयत्न करतो, पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो.

व्हिडिओमध्ये दिसतंय की तो माणूस आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करतो ज्यात त्याचा मुलगा वाचतो पण व्यक्ती मात्र बाईकखाली चिरडला जातो. सुदैवाने, मुलाला या घटनेत काहीही होत नाही पण आपल्या वडिलांचा असा शेवट तो त्याच्या डोळ्यांमध्ये साठवून ठेवतो. अपघातानंतर घटनास्थळी लोकांची गर्दी जमते आणि लोक त्या व्यक्तीला उचलण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये व्यक्तीचा या अपघातात मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

वडिलांचा(Father) आपल्या डोळ्यांदेखत असा मृत्यू होणे फारच दुःखद आहे आणि त्या चिमुकल्या मनावर त्या वेळी काय परिणाम झाला असेल याचा विचारही करू शकत नाही… अपघाताचा हा व्हायरल @DinakaranNews नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “चुकी रस्त्याची आहे, रस्त्यावर एकही दिवा नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ड्रायव्हर आंधळा होता, वडील हिरो होते, छोटासा फटका मोठा आघात, भावपूर्ण श्रद्धांजली हिरो तू तुझी पिढी वाचवलीस” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्या मुलाला काय वाटले असेल”.

हेही वाचा :

‘राज्यात ‘नवीन पुणे’, ‘नवीन नाशिक’, ‘नवीन कोल्हापूर’ असा नवा…’; फडणवीसांना सल्ला

कोल्हापूरमध्ये ऑनलाईन रम्मीच्या नादात वृद्ध महिलेची हत्या; मृतदेह गोबरगॅसच्या प्लांटमध्ये टाकला

मोठी बातमी! 14 सप्टेंबरची Ind vs Pak मॅच रद्द? सर्वोच्च न्यायालयाचा मोजून 5 वाक्यात ‘निकाल’