बॉलिवूडमधील(Bollywood news) सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक म्हणजे अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा. काही दिवसांपूर्वी या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याच्या, अगदी घटस्फोटाच्या देखील अफवा पसरल्या होत्या. मात्र गणेशोत्सवाच्या दिवशी गोविंदा आणि सुनीता एकत्र दिसल्याने सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला. दोघांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, नातं अगदी आलबेल आहे, हेच या उपस्थितीने स्पष्ट झालं.

सुनीता आहुजा अलीकडेच कलर्स वाहिनीवरील ‘पती पत्नी और पंगा – जोडीयों का रिअॅलिटी चेक’ या शोमध्ये सहभागी झाली होती. इथे गोविंदा देखील तिच्यासोबत दिसला. नॅशनल टीव्हीवर हे दोघे एकत्र पाहून प्रेक्षकांचं उत्साहाने स्वागत झालं. शोचे होस्ट मुनावर फारुकी यांनी गोविंदा–सुनीतासोबत धमाल केली. त्यात सोनाली बेंद्रेही सहभागी झाली आणि तिघांच्या उपस्थितीमुळे शोचं वातावरण रंगतदार झालं.

‘मी गोविंदाचीच बीबी नंबर वन’ शोदरम्यान मुनावरने सुनीताला गोविंदासोबत ‘बीबी नंबर वन’ या गाण्यावर नाचण्यासाठी आमंत्रित केलं. त्या वेळी सुनीता हसत म्हणाली, “मी तुझी बीबी नंबर वन नाही, मी तर गोविंदाची बीबी नंबर वन आहे.” या एका वाक्यानं संपूर्ण स्टुडिओ दणाणून गेला. यानंतर मजेमध्ये सुरू झालेल्या चर्चेतून सुनीताने गोविंदाच्या फ्लर्टिंगच्या सवयीवर थेट प्रकाश टाकला.

हलक्याफुलक्या अंदाजात बोलताना सुनीताने गोविंदाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक मोठं गुपित उघड केलं. ती म्हणाली, ‘गोविंदा जवळजवळ प्रत्येक अभिनेत्रीसोबत(Bollywood news) फ्लर्ट करायचा. मात्र सोनाली बेंद्रे ही एकमेव अभिनेत्री होती, जिच्यासोबत त्याने कधीही फ्लर्ट केलं नाही. फक्त सोनालीच वाचली.’ सुनीताच्या या विधानानंतर शोमध्ये उपस्थित प्रेक्षक आणि स्पर्धक दोघेही काही क्षणांसाठी थबकले. एवढंच नाही तर सोनाली बेंद्रेही या वक्तव्याने लाजल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं.

या चर्चेनंतर स्टेजवर सुनीता आणि सोनाली यांच्यात मजेशीर डान्स स्पर्धा रंगली. दोघींनी मिळून गोविंदाच्या ‘मैं तो रास्ते से जा रहा था’ या सुपरहिट गाण्यावर थिरकून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. या खास क्षणामुळे शोचं वातावरण अधिकच उत्साही झालं. मॅरेज रिपोर्ट कार्ड राऊंडमध्ये उघड झालं खरं चित्र शोमध्ये पुढे ‘मॅरेज रिपोर्ट कार्ड’ हा राऊंड पार पडला.

अभिनेत्री ईशा मालवीयाने सुनीताला पती गोविंदाला गुणांकन करण्यास सांगितलं. यावेळी सुनीताने गोविंदाच्या विसरण्याच्या सवयी आणि जबाबदारीबद्दल 10 पैकी 7 गुण दिले. मात्र पतीच्या निष्ठेसाठी तिने फक्त 6 गुण दिले. हे ऐकून स्टुडिओत उपस्थित प्रेक्षक आश्चर्यचकित झाले आणि क्षणभर गप्पच बसले.

शेवटी शोमधील आपला अनुभव सांगताना सुनीता म्हणाली ‘या रिअॅलिटी शोचा भाग होणे माझ्यासाठी खूप खास होतं. यात जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, बरीच मजा झाली. गोविंदाच्या गाण्यांवर पुन्हा एकदा नाचण्याची संधी मिळाली आणि सोनालीसोबत स्टेज शेअर करणे ही अविस्मरणीय आठवण ठरली. आम्ही खूप हसलो आणि जुन्या मजेदार क्षणांना पुन्हा आठवलं.’

हेही वाचा :

कोल्हापूरमध्ये ऑनलाईन रम्मीच्या नादात वृद्ध महिलेची हत्या; मृतदेह गोबरगॅसच्या प्लांटमध्ये टाकला

मोठी बातमी! 14 सप्टेंबरची Ind vs Pak मॅच रद्द? सर्वोच्च न्यायालयाचा मोजून 5 वाक्यात ‘निकाल’

बाईकस्वाराची धडक अन् चिमुकल्याच्या डोळ्यांसमोर वडिलांनी सोडले प्राण; Video Viral