मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अस्ताद काळे आपल्या थेट आणि बिनधास्त मतांमुळे कायमच चर्चेत असतो. सामाजिक आणि राजकीय(Politics) वास्तवावर भाष्य करण्याची त्याची शैली चाहत्यांना भावते. नुकताच त्याने केलेला एक सोशल मीडिया पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्याने कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची तुलना राजकारण्यांशी केली आहे आणि शिक्षण, कामकाज व जबाबदाऱ्या या तिन्ही स्तरांवरच्या विसंगतीवर खरमरीत भाष्य केलं आहे.

कॉर्पोरेटमध्ये शिक्षणाशिवाय पर्याय नाही :
अस्ताद काळेने आपल्या इन्स्टाग्रामवर लिहिलं – “कॉर्पोरेट असो, आय.टी. असो, बँकिंग असो… या क्षेत्रांमध्ये अधिकारी पदांवर पोहोचण्यासाठी उच्च शिक्षण आवश्यक आहे. महिन्याला 2.5 लाख ते 4.5 लाख रुपयांचा पगार मिळवणारे अधिकारी हे जबाबदारीने काम करतात. त्यांनी काही महिने कामात टाळाटाळ केली तर नोकरी धोक्यात येते. शिवाय ठराविक वयानंतर निवृत्तीही अनिवार्य असते.”

त्याने या माध्यमातून दाखवून दिलं की शिक्षण, मेहनत आणि जबाबदारी या घटकांवर आधारित व्यवस्था कॉर्पोरेट क्षेत्रात काटेकोरपणे राबवली जाते.

राजकारणात मात्र ‘मज्जाच मज्जा’ :
याउलट राजकारणाची(Politics)तुलना करताना अस्ताद काळे म्हणतो – “राजकारण हे एकमेव क्षेत्र आहे जिथे शिक्षणाची मूलभूत अट नाही. लोकनियुक्त प्रतिनिधी म्हणून निवडून आलात की पुढची 5 वर्षे पगार, भत्ते सुरू राहतात. दुसऱ्यांदा निवडून आलात की त्यात वाढ होते. धड काम नाही केलं तरी कुणी हकालपट्टी करत नाही. गावं, शहरं, राज्यं आणि देश चालवण्यासारखी जबाबदारी असूनही कोणतीही शिक्षा नाही. वयोमानानुसार निवृत्तीची सक्तीही नाही. मज्जाच मज्जा आहे बुवा सगळी!”

या पोस्टमधून अस्ताद काळेने थेट सध्याच्या राजकीय व्यवस्थेवर बोट ठेवले आहे. काम न करता सत्तेचा आणि पदाचा लाभ घेणाऱ्या प्रतिनिधींवर त्याचा हा उपरोधिक हल्ला असल्याचं स्पष्ट दिसतं.

सोशल मीडियावर चर्चेचा विषय :
अस्तादची ही पोस्ट सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाली आहे. अनेकांनी त्याच्या विचारांना पाठिंबा दिला आहे. “राजकारणासाठी शिक्षण आणि पात्रता गरजेची असली पाहिजे” अशी मागणी नेटकरी करत आहेत. काही जण मात्र याला विरोधही दर्शवत आहेत आणि लोकशाहीत शिक्षणापेक्षा लोकांचा विश्वास महत्त्वाचा असतो, असं मत नोंदवत आहेत.

अस्ताद काळेने याआधीही अनेक वेळा सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवला आहे. त्याची ‘पुढचं पाऊल’ ही मालिका त्याला घराघरात पोहोचवणारी ठरली होती. मात्र सध्या त्याच्या या खरमरीत पोस्टमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

हेही वाचा :

भारत-पाक क्रिकेट सामन्यावरुन खासदार संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा

सुनितानं केला गोविंदाच्या गुपिताचा धक्कादायक खुलासा म्हाणाली ‘फक्त सोनालीच वाचली…’

बाईकस्वाराची धडक अन् चिमुकल्याच्या डोळ्यांसमोर वडिलांनी सोडले प्राण; Video Viral