बीडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तीन वर्षीय चिमुकलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे दोन दिवसांपूर्वीच याच मुलीच्या(girl) वडिलांचा मृतदेहदेखील गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता.

दोन दिवसांपूर्वी जयराम बोराडे या व्यक्तीने इमामपूर रोड परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. बोराडे यांच्यासोबत त्यांची तीन वर्षांची मुलगी घरातून बाहेर निघाली होती.

मात्र बोराडे यांचा मृतदेह सापडल्यानंतर चिमुरडी कुठे गेली असा प्रश्न सर्वांना पडला होता. ती कुठे गेली? तिच्यासोबत काय घडलं? असा प्रश्न सर्वांना पडला होता. तिचा कुठेच शोध लागत नव्हता. पोलिसांकडून तिचा शोध घेण्यात येत होता. मात्र आज सकाळी याच परिसरात एका झाडाला गळफास दिलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयराम बोराडे यानेच रागाच्या भरात आधी चिमुकलीला फासावर लटकवले आणि नंतर त्याने स्वतः गळफास घेतला. जयराम याने दोन दिवसांपूर्वी मुलीला(girl) घरातून दुचाकी वर बाहेर आणले. त्यानंतर बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामनगर परिसरात एका झाडाला मुलीची गळफास देऊन निर्घुण हत्या केली. त्यानंतर याच परिसरापासून आठ किलोमीटर दूर अंतरावर जाऊन स्वतःही गळफास घेत जीवन यात्रा संपवली. कौटुंबिक कलहातून आधी हत्या आणि त्यानंतर आत्महत्या केली असावी असा अंदाज बीड पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोटच्या निष्पाप गोळ्याला गळफास देऊन हत्या करणाऱ्या पित्याने हे निर्दयी पाऊल का उचलले याचा तपास आता बीड पोलिस करत आहेत.. मात्र या घटनेनी बीडमध्ये माणुसकी शिल्लक नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. हत्या नेमकी कशामुळे केली आणि स्वतः आत्महत्या का केली याचा तपास आता बीड पोलिस करत आहेत.

हेही वाचा :

भारत-पाक क्रिकेट सामन्यावरुन खासदार संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा

सुनितानं केला गोविंदाच्या गुपिताचा धक्कादायक खुलासा म्हाणाली ‘फक्त सोनालीच वाचली…’

बाईकस्वाराची धडक अन् चिमुकल्याच्या डोळ्यांसमोर वडिलांनी सोडले प्राण; Video Viral