सोलापूर शहरातील सात रस्ता परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने हिंसक वळण घेतल्याची घटना समोर आली आहे. एटीएममध्ये व्यवहार सुरू असताना झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर मारहाणीत झाले असून, या घटनेत एका तरुणाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी तरुणावर सध्या सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, समीर इनामदार हा तरुण एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी उभा असताना दोन अन्य तरुण पैसे जमा करण्याचा प्रयत्न करत होते. व्यवहारादरम्यान ५०० रुपयांची एक नोट वारंवार परत येत असल्याने काही वेळ गेला. (Solapur city) याचवेळी समीरने त्यांना घाई करण्यास सांगितले आणि नोट बदलून देण्याचीही तयारी दर्शवली. मात्र याच मुद्द्यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला.
वाद वाढताच संबंधित तरुणांपैकी एकाने आपल्या ओळखीच्या इतरांना बोलावून घेतले. काही वेळातच सात-आठ जण घटनास्थळी आले आणि (Solapur city) त्यांनी समीरवर हल्ला चढवला. शिवीगाळ करत त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात समीरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. परिसरातील नागरिक जमा होताच आरोपी तेथून पळून गेले.
घटनेनंतर जखमी अवस्थेत असलेल्या समीरला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. (Solapur city) याप्रकरणी सदर बझार पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला असून, सध्या अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी एटीएम परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, संशयितांची ओळख पटवून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, किरकोळ कारणांवरून वाढणाऱ्या हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा
राहुरी-बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांचं भवितव्य ठरणार