महाराष्ट्र शासनाने जुलै महिन्यात देशी आणि विदेशी मद्याच्या(liquor) दरात केलेल्या वाढीचा परिणाम आता प्रत्यक्ष विक्रीच्या आकडेवारीत दिसून येत आहे. वाशिम जिल्ह्यात ऑगस्ट २०२५ मध्ये देशी व विदेशी दारूच्या विक्रीत घट झाली आहे, तर दुसरीकडे बिअरच्या विक्रीत मोठी वाढ नोंदवली गेली आहे. यावरून मद्यप्रेमींचा कल आता तुलनेने स्वस्त पर्यायाकडे झुकत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

विदेशी व देशी दारू विक्रीत घट :
मिळालेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट २०२४ मध्ये वाशिम जिल्ह्यात १,१२,३९० लिटर विदेशी दारू(liquor) विकली गेली होती. मात्र यावर्षी ऑगस्ट २०२५ मध्ये ती विक्री घटून ९३,६३६ लिटरवर आली आहे. यामुळे तब्बल १८,७५४ लिटरची घट झाली असून हे प्रमाण १६.६९ टक्के इतके आहे.

देशी दारूच्या बाबतीतदेखील घट झाली आहे, मात्र ती तुलनेने सौम्य आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये ३,७३,५४३ लिटर देशी दारू विकली गेली होती. २०२५ च्या ऑगस्टमध्ये ती विक्री घटून ३,५८,८३३ लिटर इतकी झाली आहे. म्हणजेच १४,७१० लिटरची घट झाली असून विक्री ३.९३ टक्क्यांनी घसरली आहे.

बिअरच्या विक्रीत झपाट्याने वाढ :
दारूच्या(liquor) विक्रीत घट होत असताना, बिअरची विक्री मात्र वाढताना दिसत आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये ७८,५२६ लिटर बिअर विकली गेली होती, तर ऑगस्ट २०२५ मध्ये ही विक्री वाढून ९२,०५३ लिटर झाली आहे. म्हणजेच १३,५२८ लिटरची वाढ झाली असून हे प्रमाण १७.२३ टक्के इतके आहे.

दरवाढीमुळे ग्राहकांनी महागड्या मद्याऐवजी तुलनेने कमी किमतीत मिळणाऱ्या बिअरकडे वळण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः विदेशी मद्याच्या किमती वाढल्यानंतर अनेक मद्यप्रेमींनी बिअरला पसंती दिली असल्याचे दिसून येते.

पुढील परिणाम काय? :
दरवाढीचा हा परिणाम आगामी महिन्यांतही सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर किमतीत आणखी वाढ झाली तर देशी व विदेशी दारूची विक्री आणखी घटू शकते आणि बिअरचा बाजार वाढतच जाईल. महागाईच्या झटक्यामुळे ग्राहकांचे पॅटर्न बदलत असून, मद्य उद्योगासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

हेही वाचा :

अभिनेत्री दिशा पाटणीच्या घरावर गोळीबार

सावधान! तुम्हीसुद्धा पॅरासिटामोल घेताय? एक चूक पडू शकते महागात!

शिंदे-फडणवीसांमध्ये पुन्हा नव्या वादाची ठिणगी