तुम्हाला सावध करणारी बातमी आहे. ताप आला की आपण सर्रास मेडिकलमध्ये जातो आणि एखाद्या कंपनीचे पॅरासिटामोलची गोळी घेतो आणि मोकळे होते. त्यानं आपल्याला काहीसा आरमही पडतोय. मात्र या वारंवार तुम्ही पॅरासिटामोल(paracetamol) औषध घेत असाल तर त्यामुळे तुम्हाला नुकसान होण्याचाही धोका निर्माण होऊ शकतो.

छोट्या छोट्या आजारांवर पॅरासिटामोल हे औषध आपण सर्रास घेत असतो. स्वस्त आणि केमिस्टच्या दुकानात सहज उपलब्ध होत असल्याने पॅरासिटामोल(paracetamol) कोणीही घेतो. पण हीच सवय तुमच्या अंगलट येऊ शकते. कारण पॅरासिटामोलमुळे जसा फायदा होतो तसं शरिराचं नुकसानही होऊ शकतं असा दावा तज्ज्ञांनी केलाय.

ताप आल्यास रिकाम्यापोटी पॅरासिटामोल घेणं सामान्यपणे सुरक्षित मानलं जातं. मात्र पॅरासिटामोल जास्त प्रमाण घेतलं तर लिव्हरवर ताण येतो. लिव्हरमधील एन्झामाईनची पातळी वाढते. लिव्हरचा आजार असणाऱ्यांचं, वजन कमी असणाऱ्यांचं लिव्हर कायमचं निकामी होण्याचा धोका असतो. किडनीवर ताण येऊ शकतो.. तसंच ब्लडप्रेशरमधेही अडथळा येऊ शकतो. तेव्हा साध्या साध्या आजारांवर जर तुम्ही सतत पॅरासिटामोलचा वापर करत असाल तर सावधान… पॅरासिटामोलचा हाच डोस तुमच्या जिवावर बेतू शकतो

हेही वाचा :

Hyundai Creta Electric चा ‘हा’ व्हेरिएंट क्षणार्धात होईल तुमचा,
आजचा शनिवार राशींसाठी भाग्यशाली! शनिदेव लवकरच टेन्शन दूर करणार,
टक्कलपणा येत चाललाय? मग आता चिंता सोडा, शॅम्पूत हे पदार्थ मिसळून लावा