लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका करत पुन्हा एकदा ‘मतचोरी’चा मुद्दा उचलला आहे. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी सांगितले की, देशातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मतचोरीचा असून हरियाणा आणि महाराष्ट्रातील निवडणुका चोरीला गेल्या आहेत.

मणिपूरमध्ये 2023 पासून सुरू असलेल्या हिंसाचारावरूनही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. दोन वर्षांनी मोदी मणिपूरला जात असल्याचे नमूद करत राहुल गांधी म्हणाले, “मणिपूरमध्ये बराच काळ समस्या सुरू आहेत, पण नरेंद्र मोदी आता तिथे जात आहेत. मात्र खरा गंभीर मुद्दा आज मतचोरीचाच आहे.”

या वक्तव्यामुळे राजकीय वातावरणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.