उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील मांडावर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाला अवघे चार महिने होताच एका पतीने पत्नीवर गंभीर आरोप करत पोलिसांत धाव घेतली. पत्नीने (bride)पतीच्या गुप्तांगावर ब्लेडने हल्ला केल्याची धक्कादायक तक्रार नोंदवण्यात आली आहे.

शिमला कला गावातील रहिवासी चांद वीर सिंग उर्फ चांद याने तक्रार दिली आहे की, त्याचे 29 एप्रिल 2025 रोजी तनुशी लग्न झाले. मात्र लग्नाच्या रात्रीपासूनच पत्नीने त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. तो जेव्हा तिच्याशी प्रेमाने बोलायचा किंवा जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा ती नकार देऊन खोलीतून बाहेर पडायची किंवा फोनवर कोणाशीतरी बोलण्यात व्यस्त व्हायची.

20 ऑगस्टच्या संध्याकाळी मात्र वाद चिघळला. चांदवीरच्या म्हणण्यानुसार, त्याने पत्नी तनुसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला असता तिने संतापून ब्लेडने त्याच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला आणि रक्तबंबाळ अवस्थेत कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्या गुप्तांगाला सात टाके घालून जीव वाचवला.

या तक्रारीनंतर पोलिसांनी पत्नी(bride) तनुविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला. मात्र तनुनेही उलट पतीवरच आरोप केले आहेत. तिच्या म्हणण्यानुसार, “लग्नानंतर नवरा सतत संशय घेऊ लागला. मी पालकांशी बोलले तरी त्याला वाटायचं की मी दुसऱ्याशी बोलते. तो दररोज माझ्यावर शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती करायचा. या त्रासामुळे आणि रागातून मी त्याच्यावर हल्ला केला,” असे तिने पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी कारवाई करत नववधू तनुला अटक केली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली असून “लग्नानंतर पत्नीने पतीवर असा हल्ला कसा काय केला?” या चर्चांनी उधाण आले आहे.

हेही वाचा :

एकाच बॉयफ्रेंडवरून मैत्रिणींचा वाद, होमगार्डची हत्या
१०० रुपयांपेक्षा कमी किंंमतीत खरेदी करा हे शेअर्स…
‘माझ्या नवऱ्याचा नाद सोड, नाहीतर.. पत्नीकडूनच पतीच्या प्रेयसीचे अपहरण…