पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीच्या(husband)अनैतिक संबंधाला वैतागून एका महिलेने असं काही केलंय की शहरात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क येथे ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेने पतीच्या विवाहबाह्य संबंधाला वैतागली होती. पतीच्या प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी तिने आपली आई आणि भावाच्या मदतीने पतीच्या प्रेयसीचे अपहरण केले. इतकंच नव्हे तर तिला बेदम मारहाण करत अडीच तास कारमध्ये कोंबून ठेवले. हा धक्कादायक प्रकार समोर येताच एकच खळबळ उडाली आहे.

अपहरण करण्यात आलेली 26 वर्षीय तरुणी हिंजवडीमध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात सेल्स मार्केटिंगचे काम करते. तिचे गेल्या काही महिन्यांपासून एका विवाहित पुरुषाशी प्रेम संबंध होते. ही बाब पत्नीला खटकत होती. अखेर नवऱ्याचे अनैतिक संबंध थांबवण्यासाठी संतप्त पत्नीने आपल्या भावाला आणि आईला घेऊन थेट नवऱ्याच्या प्रेयसीचे अपहरण केले.

बुधवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास ब्रम्हा क्रॉप फेज-2, विप्रो सर्कल इथ एका बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात काम करणाऱ्या महिलेच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीकडून फोन आला. ‘तुमचे पार्सल द्यायचे आहे,’ असे सांगत महिलेला ऑफिसबाहेर बोलावून घेतले. त्या ठिकाणी निळ्या रंगाच्या कारमधून आरोपी पत्नी, तिचा भाऊ आणि आई उतरले. त्यांनी महिलेला जबरदस्तीने कारमध्ये बसवून तिला ताथवडे आणि वाकड परिसरात फिरवत बेदम मारहाण केली.

‘माझ्या नवऱ्याचा(husband) नाद सोडून दे, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील’, अशी धमकी ही पत्नीने तरुणीला दिली. अखेर अडीच तासांच्या थरारा नंतर पोलिसांनी तरुणीची सुटका केली. नवऱ्याच्या अनैतिक संबंधांना कंटाळून आपण हे कृत्य केल्याची कबुली आरोपी पत्नीने पोलिसांसमोर दिली. पोलिसांनी पीडित महिलेची सुटका केली आहे. या प्रकरणात पत्नी, तिचा भाऊ व आईविरोधात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा :

ST कर्मचाऱ्यांना बाप्पा पावणार? पुढील महिन्याचा पगार गणेशोत्सवापूर्वीच……
तो यायचा, हत्या करायचा अन्… कहाणी त्या सनकीची ज्याला रक्त आवडायचे
वादळी वाऱ्यामुळे समुद्राला उधाण; बंदरावर खलाशी बेपत्ता