छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेतून(serial) प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. मालिकेत ती स्वानंदी ही भूमिका साकारात आहे जी 35 वर्षांची, स्वतंत्र विचारांची आणि अविवाहित महिला आहे, जिला तिचं कुटुंब लग्नासाठी स्थळं पाहतंय. पण या मालिकेतील तिच्या भूमिकेसारखाच मत तेजश्रीचा खऱ्या आयुष्यातही आहे.नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तेजश्रीने लिव्ह इन रिलेशनशिपबाबत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. ती म्हणाली, ‘मला लिव्ह इन रिलेशनशिप कधीच आवडलं नाही.

लिव्ह इनमध्ये राहणं म्हणजे नकळत स्वतःचीच फसवणूक करून घेणं.’ तिच्या मते, अशा नात्यांमध्ये जबाबदारीचा अभाव असतो आणि एकदा नातं बिघडलं की त्यातून सावरणं अधिक कठीण जातं. ‘लिव्ह इनमध्ये एकदा फसलो की फसलो. त्यामुळे मी कुणालाही अशा प्रकारच्या नात्यांचा सल्ला देणार नाही,’ असंही ती ठामपणे म्हणाली.
तेजश्री प्रधानचं वैयक्तिक आयुष्यही प्रकाशझोतात राहिलं आहे. काही वर्षांपूर्वी तिनं अभिनेता शशांक केतकर याच्याशी लग्न केलं होतं. मात्र हे नातं फार काळ टिकलं नाही आणि त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर तेजश्री सिंगल लाइफ जगत आहे आणि आयुष्याकडे, तसेच नात्यांकडे तिचा दृष्टिकोन अधिक समजूतदार झालेला आहे. ‘अनेक लोक ट्रायल अँड एरर पद्धतीनं नातं सुरू करतात, पण त्याची सुरुवातही जबाबदारीने व्हायला हवी,’ असं ती स्पष्टपणे सांगते.

लिव्ह इन रिलेशनशिपवर नापसंती व्यक्त करत असतानाच तेजश्रीने लग्नाबद्दल मात्र अतिशय सकारात्मक मत मांडलं. ‘लग्न ही आयुष्यातली सर्वात गोड गोष्ट आहे,’ असं ती म्हणते. तेजश्रीच्या मते, नात्यांमध्ये स्थिरता आणि विश्वास हवा असेल, तर लग्नासारख्या जबाबदारीच्या नात्याचं महत्त्व अधिक असतं.
‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत (serial)स्वानंदीचं पात्र अनेकांना भावतंय, कारण ते खूपसं आजच्या स्वतंत्र आणि विचारशील स्त्रीचं प्रतिनिधित्व करतं. विशेष म्हणजे, स्वानंदीचे विचार आणि तेजश्रीच्या वैयक्तिक जीवनातील अनुभव एकमेकांशी अतिशय साम्य राखणारे आहेत.
नात्यांबद्दल गोंधळलेल्या तरुण पिढीसाठी तेजश्री प्रधानचा हा दृष्टीकोन मार्गदर्शक ठरू शकतो. नातेसंबंधांमध्ये स्पष्टता, जबाबदारी, आणि स्थिरतेचं महत्त्व ती आपल्या प्रत्येक उत्तरातून अधोरेखित करते. कधी काळी ‘सातपाटी’ वाजवणारी तेजश्री, आज तिच्या वैयक्तिक अनुभवांतून समजून घेत आहे की नात्यांची खरी ताकद काय असते. तिच्या या स्पष्ट, प्रामाणिक मतांमुळे तिच्यावर पुन्हा एकदा कौतुकाचा वर्षाव होतोय.
तेजश्री प्रधानने स्पष्टपणे सांगितलं आहे की तिला लिव्ह इन रिलेशनशिप कधीच आवडली नाही. तिच्या मते, लिव्ह इनमध्ये जबाबदारीचा अभाव असतो आणि अशा नात्यांमध्ये राहणं म्हणजे नकळत स्वतःचीच फसवणूक करून घेणं होय. त्यामुळे ती कोणालाही लिव्ह इनचा सल्ला देत नाही.तेजश्रीचं मत आहे की, “लग्न ही आयुष्यातली सर्वात गोड गोष्ट आहे.” तिच्या मते, नात्यात स्थिरता, समजूतदारपणा आणि विश्वास हवा असेल, तर लग्नासारख्या जबाबदारीच्या नात्याचं महत्त्व अधिक आहे. मालिकेत तेजश्री स्वानंदी ही भूमिका साकारते — एक स्वतंत्र, विचारशील आणि अविवाहित स्त्री. ही भूमिका तिच्या खऱ्या आयुष्यातील दृष्टीकोनाशी खूप मिळती-जुळती आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये ही भूमिका अधिक प्रभावी ठरत आहे.
हेही वाचा :
ट्रकचालकांना होणारा दंड रद्द, राज्य सरकारची अधिसूचना जारी
अॅपल यूजर्ससाठी खुशखबर! iPhone १७च्या लाँचपूर्वी १६ प्लसवर मिळतेय मोठी सवलत, जाणून घ्या
भारत रशियाचे कपडे धुण्याचे मशीन, डोनाल्ड ट्रम्प सरकारकडून भारतावर अत्यंत खालच्या पातळीची टीका