सलमान खानच्या ‘बिग बॉस’(Bigg Boss) शोच्या १९ व्या सीझनची कन्फर्म केलेली यादी समोर आली आहे. चाहते बऱ्याच दिवसांपासून या शोची वाट पाहत आहेत. पण चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. शोमधील कन्फर्म झालेल्या स्पर्धकांबद्दल अनेक नावांची चर्चा होती. पण यापैकी आता १८ नावे कन्फर्म झाली आहेत. शोमध्ये गौरव खन्ना ते अमल मलिकपर्यंतची नावे समोर आली आहेत. सलमान खानच्या बिग बॉस १८ चे कन्फर्म झालेले स्पर्धक कोण आहेत आणि यावेळी या शोमध्ये कोणते कलाकार दिसणार आहेत ते जाणून घेऊया.

सलमान खानच्या बिग बॉस(Bigg Boss) १९ च्या स्पर्धकांबद्दल खूप शंका प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाल्या होत्या. पण आता ही शंका पूर्णपणे दूर झाली आहे. कारण शोची कन्फर्म लिस्ट समोर आली आहे. यावेळी शोमध्ये अशनूर गौर, नेहल चुडासमा, नगमा मिराजकर, तानिया मित्तल, नटाइला, नीलम गिरी, झीशान कादरी, गौरव खन्ना, बसीर अली, अभिषेक बजाज, अमल मलिक, मृदुल तिवारी, आवाज दरबार, शाहबाज बदेशा, प्रणित मोरे, डिनो जेम्स, कुनिचका सदानंद आणि अतुल किशन यांसारख्या कलाकारांची नावे आहेत.
तसेच, अशी बातमी देखील समजली आहे की प्रसिद्ध बॉक्सर माइक टायसन देखील सलमान खानच्या लोकप्रिय शोमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये त्याचे नाव देखील समोर ले आहे. तसेच, अभिनेत्याने शोने दिलेल्या प्रस्तावावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. जर असे झाले तर चाहते खरोखर आनंदी होतील आणि शोचे उर्वरित स्पर्धक अडचणीत येतील. आता बॉक्सर माइक टायसन सहभागी होतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
सलमान खानचा हा लोकप्रिय शो खूप पुढे आला आहे आणि त्याची १९ वी आवृत्ती घेऊन सलमान खान येण्यास सज्ज झाला आहे. शोची स्पर्धक यादी आता समोर आली आहे. यावेळी सलमान खानचा शो ३ ऐवजी ५ महिने दाखवला जाणार असल्याचे समजले आहे. तुम्ही हा शो कलर्स वाहिनीवर रात्री १०:३० वाजता पाहू शकता.
हेही वाचा :
एकनाथ शिंदेगट-महायुतीत फूट पडणार?
अॅपल यूजर्ससाठी खुशखबर! iPhone 16 Plus वर आकर्षक ऑफर उपलब्ध
पुढच्या सीझनमध्ये नव्या नावासह मैदानात उतरणार नीता अंबानींची टीम