“बारामती” चे राजकारण !……..

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी ..

अजितदादा पवार यांच्या (constituency)अपघाती निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक गेल्या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर झाली. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. पण या निवडणुकीच्या निमित्ताने व्यक्ती सापेक्ष राजकारण कसे असते याचे दर्शन महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला घडले. शरद पवार यांचे दुटप्पी राजकारण, खासदार पार्थ पवार यांची अपरिपक्वता, भारतीय जनता पक्षाची हतबलता, काँग्रेसचे तथाकथित उदारीकरण असे अनेक पैलू या पोटनिवडणुकीला आहेत.

अजित दादा पवार यांचे (constituency)दिनांक 28 जानेवारीला विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या जागी श्रीमती सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. आता त्यांना विधानसभेवर निवडून जाणे अनिवार्य आहे. आता बारामती विधानसभा मतदारसंघात पोट निवडणूक होत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने या निवडणुकीत आपला उमेदवार दिलेला नाही. काँग्रेसने मात्र आकाश मोरे यांची उमेदवारी जाहीर केली होती.

बारामती विधानसभा (constituency)मतदारसंघात सुनेत्रा पवार यांच्या विरोधी काँग्रेसने आपला उमेदवार देण्याची केलेली घोषणा योग्य आहे. असे सांगणाऱ्या शरद पवार यांनी बारामतीची जागा अपघातामुळे रिक्त झालेली आहे. तेव्हा या पोटनिवडणुकीत काँग्रेसने आपला उमेदवार तेथे उभा करू नये असा त्यांना माझा सल्ला आहे अशी दुटप्पी भूमिका घेऊन सर्वांनाच चकित करून टाकले आहे

नुकतेच राज्यसभेवर (constituency)निवडून गेलेले पार्थ पवार यांनी मात्र बारामती मध्ये सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यानंतर, काँग्रेसला त्याची किंमत चुकवावी लागेल, काँग्रेसचा डाऊन फॉल सुरू आहे, काँग्रेसला उतरती कळा लागली आहे अशी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. त्याबद्दल शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवारांचे कान टोचल्यानंतर, ते राजकीय दृष्ट्या भानावर आलेले दिसतात.

आता त्यांनी काँग्रेसने उमेदवार (constituency)मागे घेतल्याबद्दल आभार मानले आहेत. राष्ट्रीय काँग्रेसला बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये आपला उमेदवार द्यायचा नव्हता तर त्यांनी तो घोषित का केला? भारतीय जनता पक्षासह अन्य राजकीय पक्षांनी आपली समजूत काढावी अशी अपेक्षा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना असावी. आणि म्हणूनच सुनेत्रा पवार यांनी त्यांची दोन वेळा भेट घेऊन काँग्रेसने उमेदवार देऊ नये अशी विनंती केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे या मंडळींनी बारामती विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने आपला उमेदवार देऊ नये असे आवाहन केले होते.

अर्ज माघारी घेण्याच्या (constituency)अखेरच्या दिवशी शेवटच्या दोन तासात काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी अर्ज माघार घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आता या मतदारसंघात राष्ट्रवादी अजितदादा गट यांच्याशिवाय कोणत्याही राजकीय पक्षाचा उमेदवार उभा नाही. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाने या मतदारसंघात अर्थातच आपला उमेदवार दिलेला नाही पण सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात हा गट असेल असे नाही. कारण सुप्रिया सुळे यांनी यावर बोलण्यास टाळले आहे.

या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने (constituency)भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा दुटप्पीपणा दिसून आला आहे. कारण चार वर्षांपूर्वी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून गेलेले काँग्रेसचे चंद्रकांत जाधव यांचे नंतरच्या दोन वर्षातच अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यानंतर या मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली होती तेव्हा या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार उभा केला होता. तेव्हाही काँग्रेसने भाजपला या पोटनिवडणुकीत उमेदवार देऊ नये असे आवाहन केले होते, मात्र या आवाहनाला प्रतिसाद भाजपने दिला नव्हता. बारामतीच्या पोटनिवडणुकीत मात्र भाजपच्या नेत्यांनी काँग्रेसने उमेदवार देऊ नये असे आवाहन केले होते. त्यामुळेच भाजपचा दुटप्पीपणा या निमित्ताने स्पष्ट झाला आहे.