मुंबई इंडियन्सच्या (Indians)मालकीण नीता अंबानी यांनी त्यांच्या इंग्लंडमधील द हंड्रेड लीग संघाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. 2026 पासून ओव्हल इनव्हिन्सिबल्स संघ एमआय लंडन या नावाने मैदानात उतरेल.

सध्या ओव्हल इनव्हिन्सिबल्स संघ इंग्लंडमध्ये शानदार कामगिरी करत आहे. 6 पैकी 5 सामने जिंकून संघ पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. ट्रेट रॉकेट्स विरुद्ध सामन्यात, जॉर्डन कॉक्स आणि सॅम करन यांनी संघासाठी निर्णायक फलंदाजी करत विजय सुनिश्चित केला. संघाचा कर्णधार सॅम बिलिंग्ज आहे.

अंबानी कुटुंबाने या वर्षाच्या सुरुवातीला 123 दशलक्ष युरोमध्ये संघातील 49 टक्के हिस्सा खरेदी केला होता. नाव बदलल्यानंतर, एमआय लंडन हा संघ अंबानी कुटुंबाच्या जागतिक एमआय ब्रँडची यादीत नवीन नाव म्हणून सामील होईल. यामध्ये आधीच असलेल्या संघांचा समावेश आहे: एमआय केपटाऊन, मुंबई इंडियन्स(Indians), डब्ल्यूपीएलमधील मुंबई इंडियन्स, एमआय न्यू यॉर्क, एमआय एमिरेट्स.

ECB ने द हंड्रेडमध्ये काउंटी नावांचा वापर करण्यास मनाई केल्याने, एमआय लंडन या नावावर कोणतीही अडचण येणार नाही. अंबानी कुटुंबाने एमआय ब्रँडला जागतिक स्तरावर अधिक बल देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.यंदाच्या हंगामात संघाची कामगिरी उत्तम असल्याने, नाव बदलल्यानंतरही एमआय लंडनचा संघ इंग्लंडमध्ये चमकदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा :

एकाच बॉयफ्रेंडवरून मैत्रिणींचा वाद, होमगार्डची हत्या
लग्नानंतर नववधूने केलं भयानक कांड, पती हादरलाच ! मधुचंद्रांच्या रात्री तिने..
अ‍ॅपल यूजर्ससाठी खुशखबर! iPhone 16 Plus वर आकर्षक ऑफर उपलब्ध