दसऱ्याआधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशभरातील ग्राहकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.(Bank)रेपो दर 5.5% वर कायम ठेवण्यात आला आहे, अशी घोषणा गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज 1 ऑक्टोबर 2025 केली. तीन दिवस चाललेल्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. रेपो दरात बदल न झाल्यामुळे होम लोन आणि कार लोनचे हप्ते तसेच राहणार आहेत. ज्यांनी आधीपासून लोन काढले आहे किंवा नवे लोन घेण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. मात्र, सणासुदीच्या पार्श्वभूमीवर RBI ने कोणताही दिलासा दिला नाही. त्यामुळे ग्राहकांना या दिवाळीत खर्चाचे बजेट सांभाळावे लागणार आहे.

गव्हर्नर मल्होत्रा यांनी सांगितले की, देशातील एकूण महागाईचे चित्र पूर्वीपेक्षा अधिक अनुकूल आहे. (Bank)विशेषतः खाद्यपदार्थांच्या किमतीत वेगाने घट झाली आहे. त्यामुळे केंद्रीय बँकेने या वर्षासाठी सरासरी महागाई दराचा अंदाज 3.1% वरून कमी करून 2.6% केला आहे.सरकारने GST स्लॅबमध्ये केलेल्या बदलांचा फायदा ग्राहकांना मिळू शकतो. काही आवश्यक वस्तू व सेवांवरील GST कमी झाल्याने खरेदी खर्चावर थोडासा आराम मिळेल. यामुळे बाजारपेठेत खर्च करण्याची गती वाढेल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.

दुसरीकडे, दसऱ्याआधी सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. (Bank)त्यामुळे उत्सवाच्या खरेदीसाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागतील. गृहकर्जावर दिलासा न मिळाल्याने आणि सोन्याच्या वाढलेल्या किमतींमुळे सामान्य ग्राहकांचे बजेट अधिक ताणले जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
‘या’ बँकांच्या FD मध्ये आगाऊ गुंतवणूक करा,
नवरात्रीनंतर कलशात ठेवलेल्या नारळाचे काय करावे?
समाजाच्या सहयोगामुळेच संघाचा शताब्दी पर्यंतचा प्रवास सुखकर झाला