नागरिकांना पीएफ फंडमधून लवकरात लवकर आणि सोप्या पद्धतीने पैसे (relief)काढता यावे यासाठी EPFO नवीन सुविधा सुरू करणार आहे. लवकरच ATM मधून पीएफ फंड काढण्याची सुविधा सुरू केली जाणार आहे. या सुविधेमुळे आता तुम्हाला तुमचे पीएफचे पैसे काढणे काही मिनिटांची गोष्ट होणार आहे. त्यामुळे अडीअडचणीच्या वेळी आता तुम्ही एटीएममधून डायरेक्ट पैसे काढू शकता.देशभरात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे ७ कोटीहून अधिक खातेदार आहेत, आणि या कोट्यवधी सदस्यांसाठी एक दिलासादायक निर्णय EPFO कडून घेण्यात आला आहे.

पीएफचे पैसे काढण्यासाठी फॉर्म भरा आणि मग अनेक दिवस वाट पाहा अशी प्रक्रिया होती. पैसे काढण्याच्या प्रक्रियेत बराच वेळ जातो. परंतु आता ही प्रक्रिया काही मिनिटांत होऊ शकते.(relief) ईपीएफओ एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा सुरू करणार आहे. यामुळे सर्व सदस्यांना मोठा फायदा होणार आहे. जानेवारी 2026 पासून ही सुविधा लागू होणार असल्याची बातमी समोर आली आहे. त्यानंतर आता आपत्कालीन परिस्थितीत 3 ते 4 दिवस वाट पाहण्याची गरज सदस्यांना पडणार नाही.

एटीएममधून पैसे काढण्यासाठी लागणारी तांत्रिक तयारी सुरू झाली असून सुटकेच्या पद्धती आणि पैसे काढण्याची मर्यादा यावर अजून चर्चा झालेली नाहीये. सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या बैठकीत यावर चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतरच या सुविधेला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.(relief)सध्या लागू असणाऱ्या नियमांनुसार काही कारणास्तव तुमची नोकरी जर गेली तर एक महिन्यानंतर पीएफ खात्यातून पैसे काढू शकता. एकूण अमाऊंट पैकी 75 टक्के रक्कम ही एका महिन्यानंतर काढली जाऊ शकते. बाकीच्या 25 टक्के रकमे साठी दोन महिन्यांचा कालावधी जाऊ द्यावा लागतो.

नवीन नियम काय असतील हे अंतिम निर्णय आल्यानंतर सांगितले जाईल, परंतु पैसे काढण्यासाठी एवढा वेळ लागणार नाही हे नक्की. त्यामुळे सदस्यांना दिलासा मिळणार आहे.(relief)इपीएफओची ही नवीन सुविधा लागू झाल्यावर तुम्हाला सामान्य डेबिट कार्डमधून जसे पैसे काढतात तसेच एटीएममधून पीएफचे पैसे काढता येतील. त्यासाठी एक विशेष कार्ड दिले जाणार आहे. विशेष म्हणजे जर तुमचे पीएफ खाते UPI शी संलग्न असेल तर UPI चा वापर करून देखील हे पैसे काढले जाऊ शकतील.

हेही वाचा :

‘या’ बँकांच्या FD मध्ये आगाऊ गुंतवणूक करा,

नवरात्रीनंतर कलशात ठेवलेल्या नारळाचे काय करावे?

समाजाच्या सहयोगामुळेच संघाचा शताब्दी पर्यंतचा प्रवास सुखकर झाला