आज दसऱ्याचा शुभ दिन आणि गुरूवार 12 राशींसाठी कसा असेल?(today)कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या…
दसऱ्याचा शुभ दिन ‘या’ 6 राशींसाठी भाग्याचा! दत्तगुरू पाठीशी भक्कम, लक्ष्मी-कुबेराची मोठी कृपा, 12 राशींचे राशीभविष्य वाचा.

वैदिक पंचांगानुसार, आज 2 ऑक्टोबर 2025, आजचा वार गुरूवार आहे.(today) आज दशमी तिथी आहे. आज विजयादशमी म्हणजेच दसरा असल्याने हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

मेष रास
मेष राशीच्या लोकांनो आज जोडीदाराचे सहकारी उत्तम मिळेल, व्यवसायामध्ये विचाराने कोणतेही धाडस करू नये

वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांनो आज यंत्रावर काम करताना सांभाळून राहावे, कोणताही नवीन विचार लोकांपुढे मांडण्यात अयशस्वी होण्याची शक्यता आहे

मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांनो आज इतरांशी फटकून वागाल, वेळच्या वेळी काम आणि(today) आरामाच्या वेळी आराम हे सूत्र लक्षात ठेवा

कर्क रास
कर्क राशीच्या लोकांनो आज महिला परिस्थितीनुसार आचरण ठेवतील स्वतःशी प्रामाणिक राहिलात, तर न्यूनगंड भेडसावणार नाही

सिंह रास
सिंह राशीच्या लोकांनो आज वडिलोपार्जित इस्टेट संबंधी सरकारी कामांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात, प्रकृतीची काळजी घ्यावी

कन्या रास
कन्या राशीच्या लोकांनो आज सत्ता स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कधी सावध तर कधी आक्रमक पवित्रा ठेवून प्रगती करावी लागेल

तूळ रास
तूळ राशीच्या लोकांनो आज मध्यस्तांची मदत घेऊन काही कामे पुढ सरकवावी लागतील, परंतु स्वतःच्या मताशी ठाम राहाल

वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज नोकरीमध्ये स्वतःच्या मताप्रमाणे वागताना वरिष्ठांचा विचार न केल्यामुळे संघर्षात्मक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे

धनु रास
धनु राशीच्या लोकांनो आज महिला घरामध्ये शिस्तीचा बडगा जास्त दाखवतील, विमा एजंटचे काम करणाऱ्या लोकांना फायदा मिळेल.

मकर रास
मकर राशीच्या लोकांनो आज एखाद्या माणसाचे वागणे तुम्हाला पटले नाही तर त्याची जाणीव लगेच देणार नाही, अतिचांगल्या वागणुकीचे तोटे सहन करावे लागतील.

कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांनो आज व्यवसायात खूप कष्ट करून सुद्धा लाभ न मिळाल्यामुळे थोडे नाराज व्हाल

मीन रास
मीन राशीच्या लोकांनो आज ज्यांना उपासना मार्गाची आवड आहे, त्यांना संधी मिळून अध्यात्मिक उन्नती साधून घ्याल.

हेही वाचा :

‘या’ बँकांच्या FD मध्ये आगाऊ गुंतवणूक करा,

नवरात्रीनंतर कलशात ठेवलेल्या नारळाचे काय करावे?

समाजाच्या सहयोगामुळेच संघाचा शताब्दी पर्यंतचा प्रवास सुखकर झाला