महाराष्ट्रात वादळ आणि अतिवृष्टीची शक्यता निर्माण झाली आहे अशी माहिती MWF ने दिली आहे. उत्तर-पश्चिम बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून वादळाची स्थिती निर्माण झाली आहे. हे वादळ गुजरातकडे तीव्र वेगाने येत आहे आणि २४ ते ४८ तासांत हे वादळ गुजरातला येऊन धडकणार असल्याचे वर्तवण्यात आले आहे. आता गुजरातच्या खाडीत देखील कमी दाबाची पट्टी निर्माण झाली असून त्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे.

बंगालच्या खाडीत कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्याने ६ ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरू राहण्याचीही शक्यता आहे. ३-४ ऑक्टोबरला कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता वाढू शकते. ५-७ ऑक्टोबरदरम्यान पश्चिमी विक्षोभ अधिक सक्रिय होण्याची शक्यता दर्शवण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ऊन-पावसाची परिस्थिती कायम राहणार असून पाऊस पडला तरी वातावरण स्थिर राहणार नाही.गुजरातच्या खाडीत कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात हवामानामध्ये मोठे बदल घडू शकतात. याचा महाराष्ट्रावर कसा परिणाम होईल याकडे हवामान खात्याचे लक्ष आहे. जर हे वादळ महाराष्ट्राकडे वळले तर अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे.

मान्सूनचा परतीचा पाऊस ५ ऑक्टोबरपर्यंत संपण्याचा अंदाज आहे. परतीचा पाऊस जरी संपला तरी अवकाळी पावसाचे संकट असणारच असे हवामान खात्याने सांगितले आहे. तसेच ऑक्टोबर हीटचा परिणाम रात्री जास्त जाणवू शकतो. यादरम्यान महाराष्ट्रात अतिउष्ण वातावरण नसेल, परंतु दमट हवामान पाहायला मिळेल. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गरमी वाढेल.बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र सध्या अस्थिर स्थितीत असल्याने मान्सूनची माघार थांबलेली आहे. परिणामी अनेक राज्यांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या परिस्थिती नाजूक असून, या दोन समुद्रांत निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र आता खोल दाबाच्या पट्ट्यात परिवर्तित झालं आहे.

किनारी भागात प्रचंड वारे सुटले असून बंगालच्या उपसागरालगतच्या परिसरात ताशी 65 ते 75 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.चक्रीवादळामुळे पुढील चार-पाच दिवसांमध्ये जवळपास १२ राज्यांत मुसळधार पाऊस पडणार असल्याचे वर्तवण्यात आले आहे. ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश तसेच पूर्व उत्तर प्रदेशाच्या काही भागांत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशाच्या आसपास विक्रमी पाऊस होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

आजपासून कागदी बाँड हद्दपार तर नव्या E-Bondची एंट्री; राज्य सरकारचा मोठा निर्णय

महानगरपालिका मुख्यालयातील सार्वजनिक टॉयलेट्स नागरिक व कर्मचाऱ्यांसाठी खुले करा उमाकांत दाभोळे .

राजकीय कार्यकर्त्याच्या घरातून 11 सशस्त्र गुंडांना अटक; एटीएसच्या कारवाईने एकच खळबळ…